‘त्या’ पुस्तकांचे गठ्ठे गायब! विरोधी पक्षनेत्यांचा आरोप, तावडेंचा खुलासा असमाधानकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 01:49 AM2018-02-16T01:49:41+5:302018-02-16T01:49:49+5:30

अवांतर वाचन उपक्रमांतर्गत खरेदी केलेल्या पुस्तकांत आक्षेपार्ह मजकूर आढळल्याने त्या पुस्तकांचे गठ्ठे गायब करण्यात आले असून नवीन पुस्तके ५ ते ६ दिवसांत आणून देण्याची तंबी प्रकाशकांना देण्यात आल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

The 'batch of books' disappeared! The allegations of opposition leaders, disclosure of pauses, unsatisfactory | ‘त्या’ पुस्तकांचे गठ्ठे गायब! विरोधी पक्षनेत्यांचा आरोप, तावडेंचा खुलासा असमाधानकारक

‘त्या’ पुस्तकांचे गठ्ठे गायब! विरोधी पक्षनेत्यांचा आरोप, तावडेंचा खुलासा असमाधानकारक

Next

मुंबई : अवांतर वाचन उपक्रमांतर्गत खरेदी केलेल्या पुस्तकांत आक्षेपार्ह मजकूर आढळल्याने त्या पुस्तकांचे गठ्ठे गायब करण्यात आले असून नवीन पुस्तके ५ ते ६ दिवसांत आणून देण्याची तंबी प्रकाशकांना देण्यात आल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी
पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
शालेय शिक्षण विभागामार्फत राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या भारतीय विचार साधना या प्रकाशनाकडून चढ्या दराने खरेदी करण्यात आलेल्या पुस्तकांमधील ‘बाळ नचिकेत’ या पुस्तकात कोणताही आक्षेपार्ह
मजकूर नाही, असा खुलासा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. मग ही पुस्तके का गायब करण्यात आली, असा सवाल विखे यांनी उपस्थित केला.
‘बाळ नचिकेत’ या पुस्तकाबाबत खुलासा करताना तावडे
यांनी ‘ऋषी अत्री’ ‘श्री सारदा
माता’ या पुस्तकांचा जाणीवपूर्वक उल्लेख टाळला. शिवाय,
या पुस्तकांच्या खरेदीत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत त्यांनी समाधानकारक स्पष्टीकरण दिलेले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाशी निगडित ‘भारतीय
विचार साधना’ या प्रकाशन
संस्थेचे जे पुस्तक २० रुपयांना उपलब्ध आहे, तेच पुस्तक
सरकारने ५० रुपयांत खरेदी
केले असून, या प्रकाशनाकडून
तब्बल ८ कोटी १७ लाख रुपयांची खरेदी झाली आहे. ही पुस्तके
अडीच पट जादा किमतीने का
खरेदी करण्यात आली, याबाबत शिक्षणमंत्र्यांनी उत्तर द्यावे,
असे आवाहन विखे पाटील यांनी
केले आहे.

दिवाळी, ईद गायब
खरेदी करण्यात आलेल्या ‘भारत के त्योहार’ या पुस्तकामध्ये दिवाळी आणि ईद या दोन मोठ्या सणांचा उल्लेख नाही.

Web Title: The 'batch of books' disappeared! The allegations of opposition leaders, disclosure of pauses, unsatisfactory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.