Join us

लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला अटक

By admin | Published: January 03, 2015 12:53 AM

सात हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी वरळी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक गोपाळ शिंदे यांना अटक केली़

मुंबई : लॉटरीचा व्यवसाय करणाऱ्याकडून कायदेशीर कारवाई न करण्याच्या बदल्यात सात हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी वरळी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक गोपाळ शिंदे यांना अटक केली़ महत्त्वाचे म्हणजे या लाचेच्या रक्कमेपैकी पाच हजार रुपये आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी हवे असल्याचे शिंदे यांनी आरोपीला सांगितले होते़डिसेंबर व जानेवारी महिन्याचे मिळून सात हजार रुपये शिंदे यांनी या लॉटरी स्टॉलधारकाकडे मागितले होते़ यातील पाच हजार रुपये वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी तर दोन हजार रुपयांपैकी हजार रुपये सहकार्यासाठी हवे असल्याचे शिंदे यांनी लॉटरी स्टॉलधारकाला सांगितले होते़ त्याने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली़ त्यानुसार सापळा रचून शिंदे यांना अटक करण्यात आली़ (प्रतिनिधी)