महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे बॅटरीवर चालणारे वाहन राजभवनाकडे सुपूर्द

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 08:08 PM2017-10-31T20:08:30+5:302017-10-31T20:11:10+5:30

मुंबई - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) राजभवनात येणाऱ्या पर्यटकांसाठी बॅटरीवर चालणारे वाहन देण्यात आले आहे.

Battery-operated vehicle by Maharashtra Tourism Development Corporation handed over to the Raj Bhavana | महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे बॅटरीवर चालणारे वाहन राजभवनाकडे सुपूर्द

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे बॅटरीवर चालणारे वाहन राजभवनाकडे सुपूर्द

Next

मुंबई - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) राजभवनात येणाऱ्या पर्यटकांसाठी बॅटरीवर चालणारे वाहन देण्यात आले आहे. पर्यटकांचा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित होण्याकरिता हे पाऊल उचलण्यात आले आहे. राजभवन पाहण्याकरिता येणारी पर्यटकांची वाढणारी संख्या पाहता पर्यटकांसाठी आकर्षण असलेले हे ठिकाण अधिक विकसित करण्यासाठी सरकारतर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत.

राजभवन हे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे अधिकृत निवासस्थान आहे. सर्वांना हे ठिकाण पाहता यावे यासाठी आठवड्यातील 6 दिवस या वारसास्थळाची कवाडे खुली केली जातात. ही दोन तासांची भ्रमंती असून या सहलीत राजभवनात फेरफटका मारला जातो. राजभवनात पर्यावरणस्नेही भ्रमंती करण्यासाठी बॅटरीवर चालणारे हे वाहन नक्कीच उपयुक्त ठरेल.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे काही नैसर्गिकदृष्ट्या संवेदनशील ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. थंड हवेची ठिकाणे, किनारपट्टीवरील ठिकाणे आणि तीर्थस्थळांचा यात समावेश असून या ठिकाणी डिझेल किंवा पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांना परवानगी देण्यात येणार नाही. केवळ बॅटरीवर चालणारी किंवा ई-वाहनानांचा या ठिकाणी परवानगी देण्यात येईल जेणेकरून या ठिकाणी शून्य प्रदूषण होईल. राज्य सरकारतर्फे काही शहरे ही सायकलिंग हॉटस्पॉट म्हणून विकसित करण्यात येणार आहे आणि पर्यावरणस्नेही पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे.

यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे सन्माननीय पर्यटनमंत्री जयकुमार रावल म्हणाले, "पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि मुंबईतीली हे वारसास्थळ अधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राजभवनाकडे बॅटरीवर चालणार वाहन सुपूर्द करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. मलबार हिल येथील राजभवन हे राज्यपालांचे निवासस्थान पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण आहे आणि महाराष्ट्राला पर्यावरणस्नेही पर्यटन ठिकाणात परिवर्तीत करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. वाढत्या पर्यटकांच्या मागण्या पुरविण्याच्या दृष्टीने एमटीडीसीकडून घेण्यात आलेले हे छोटेसे पाऊल आहे.
एमटीडीसीबद्दल
पर्यटन हे राज्यातील वेगाने प्रगती करणारे क्षेत्र आहे. या क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळते आणि या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. राज्यातील पर्यटन क्षेत्राचा विकास करणे या उद्दिष्टाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) स्थापन करण्यात आले. स्थापनेपासूनच पर्यटन स्थळांचा विकास आणि देखभाल यात एमटीडीसी आघाडीवर राहिले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील विविध ठिकाणी या महामंडळातर्फे रिसॉर्ट चालविण्यात येतात. पर्यटकांना सहकार्य करण्यासाठी एमटीडीसीने राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी माहिती केंद्रे सुरू केली आहेत. या माहिती केंद्रांमध्ये महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे, तेथे जाण्यासाठी उपयुक्त ठरणारे नकाशे, महाराष्ट्र पर्यटन मार्गदर्शक पुस्तिका आणि पर्यटन पुस्तके वाजवी किमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. महाराष्ट्र हे भारतातील पर्यटनाचे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. येथे स्वच्छ सागरकिनारे, अभयारण्ये, थंड हवेची ठिकाणे, नैसर्गिक गुंफा, धबधबे, भव्य किल्ले, विविधरंगी महोत्सव, प्राचीन तीर्थस्थळे, वस्तुसंग्रहालये आणि ऐतिहासिक स्थळे आहेत.

Web Title: Battery-operated vehicle by Maharashtra Tourism Development Corporation handed over to the Raj Bhavana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.