चंद्रपूरमधील दारूबंदी कायम राहणार, बावनकुळे यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 05:25 AM2019-05-30T05:25:46+5:302019-05-30T05:26:00+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी स्पष्ट पत्रपरिषदेत स्पष्ट केले.

Bavanukule explanation will continue to be a continuation of Chandrapur's liquor | चंद्रपूरमधील दारूबंदी कायम राहणार, बावनकुळे यांचे स्पष्टीकरण

चंद्रपूरमधील दारूबंदी कायम राहणार, बावनकुळे यांचे स्पष्टीकरण

Next

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी स्पष्ट पत्रपरिषदेत स्पष्ट केले. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठवण्याची मागणी तेथील नवनिर्वाचित खासदार सुरेश धानोरकर यांनी अलीकडेच केली आहे. चंद्रपूरमध्ये दारुबंदी सुरुच राहील, असे स्पष्ट करून बावनकुळे यांनी, विद्यमान खासदारांनी दारुबंदी उठवण्याची मागणी का केली, याची अद्याप आम्हाला उलगडा झाला नल्याचे सांगितले.
गुलाबाच्य पाकळ्यांपासून वाईनची निर्मितीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुण्यातील एका महिला बचत गटाने याचे सादरीकरण केले असून प्रकल्प सुरु झाल्याची माहितीही त्यांनी दिली. मधापासूनही वाईन निर्मिती करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
विक्रमी महसूल प्राप्ती
२०१८-१९ या वर्षात राज्य उत्पादन शुल्क विभागाला १५ हजार ३२३ कोटी रूपये व विक्री कराच्या स्वरूपात सुमारे १० हजार कोटी रूपये असा एकूण २५ हजार ३२३ कोटी रुपये विक्रमी महसूल प्राप्त झाला आहे. कामकाजात करण्यात आलेल्या सुलभतेमुळे महसूल वाढल्याचे मंत्री बावनकुळे म्हणाले.
रुफ टॉप रेस्टॉरंट निवासी इमारतीत नाही रुफटॉप रेस्टॉरंटसाठी नियमावली कडक केली आहे. मद्य सर्व्ह करायला परवानगी दिली जाईल.
पण किचनला परवानगी मिळणार नाही. तसेच निवासी इमारतींमध्ये रुफ टॉप रेस्टॉरंटला परवानगी देण्यात येणार नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Bavanukule explanation will continue to be a continuation of Chandrapur's liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.