Join us

बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम सीईटीचा निकाल जाहीर

By रेश्मा शिवडेकर | Published: June 27, 2024 9:32 PM

विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन आयडीमध्ये निकाल पाहता येईल.

मुंबई- बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाकरिता घेण्यात आलेल्या सीईटीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन आयडीमध्ये निकाल पाहता येईल.

या अभ्यासक्रमाकरिता अतिरिक्त सीईटी घेण्यात येणार आहे. आता निकाल जाहीर झालेल्या सीईटीच्या गुणांबाबत जे विद्यार्थी समाधानी नाहीत, त्यांनाही अतिरिक्त सीईटीला बसता येईल. आपला निकाल सुधारण्याची संधी त्यांना मिळेल, असे सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता २९ मे रोजी सीईटी घेण्यात आली होती. यंदा प्रथमच झालेल्या या सीईटीला राज्यभरातून ५५ हजार विद्यार्थी बसले होते. मात्र या अभ्यासक्रमांमध्ये मागील वर्षी झालेल्या प्रवेशांच्या तुलनेत फारच कमी विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती. अनेकांना सीईटीबाबत वेळेत माहिती न मिळाल्याने त्यांची प्रवेशाचे संधी हुकण्याची भीती होती.

त्यामुळे विद्यार्थी-पालकांकडून अतिरिक्त सीईटी घेण्याची मागणी होत होती. त्याबाबत राज्य सरकारकडून सूचना आल्यानंतर सीईटी सेलने अतिरिक्त परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या अतिरिक्त सीईटीचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, अशी माहिती सेलकडून देण्यात आली. 

टॅग्स :महाविद्यालय