बीडीडी, पत्राचाळीला 500 काेटी, म्हाडाकडून दिवाळीची भेट, महाराष्ट्र निवारा निधीचा करणार वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 12:57 PM2023-11-11T12:57:13+5:302023-11-11T12:57:31+5:30

बीडीडीसह पत्राचाळ रहिवाशांना मोठी दिवाळी भेट मिळाली असून त्यांची दिवाळी गोड होणार आहे.  

BDD, 500 crores to Patrachali, Diwali gift from MHADA, Maharashtra shelter fund to be used | बीडीडी, पत्राचाळीला 500 काेटी, म्हाडाकडून दिवाळीची भेट, महाराष्ट्र निवारा निधीचा करणार वापर

बीडीडी, पत्राचाळीला 500 काेटी, म्हाडाकडून दिवाळीची भेट, महाराष्ट्र निवारा निधीचा करणार वापर

मुंबई : धारावी पुनर्वसन प्रकल्पातील रेल्वेची जागा घेण्यासाठी म्हाडासह महाराष्ट्र निवारा निधीतून देण्यात आलेले ५०० कोटी रुपये म्हाडाला परत मिळाले असून, या पैशाचा वापर आता बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पासाठी केला जाणार आहे. बीडीडीसह पत्राचाळ रहिवाशांना मोठी दिवाळी भेट मिळाली असून त्यांची दिवाळी गोड होणार आहे.  
शासनाने दिलेल्या आदेशानुसार, धारावी पुनर्वसन प्रकल्पातील सेक्टर १ ते ५ च्या विकासाकरिता धारावी पुनर्वसन प्रकल्पाला रेल्वेची जागा घेण्यासाठी म्हाडातर्फे देण्यात आलेले २०० कोटी आणि म्हाडाने महाराष्ट्र निवारा निधीतून उपलब्ध करून दिलेले ३०० कोटी रुपयांचा निधी धारावी पुनर्विकास प्रकल्पातर्फे म्हाडाला परत करण्यात आला आहे. निधी परत आल्याने म्हाडाच्या स्वनिधीतून सुरू असलेल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाला गती मिळणार आहे, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सांगितले.

बीडीडी चाळ वरळी
वरळी येथे ९६८९ पुनर्वसन सदनिका उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सुधारित आराखड्यानुसार टप्पा क्रमांक १ मध्ये पुनर्वसन इमारत क्रमांक १ मधील ८ विंगचे काम व इमारत क्रमांक ६ मधील ६ पैकी २ विंगचे काम प्रगतिपथावर आहे.
बीडीडी चाळ नायगाव
नायगाव येथे ३३४४ पुनर्वसन सदनिकांचे नियोजन असून पहिल्या टप्प्यातील ८ पुनर्वसन इमारतींपैकी ५ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू आहे.
बीडीडी चाळ ना. म. जोशी मार्ग
ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत २५६० पुनर्वसन सदनिकांची निर्मिती करण्यात येणार असून पहिल्या टप्प्याअंतर्गत एकूण ७ विंगपैकी ४ विंगच्या बेसमेंटचे काम प्रगतिपथावर आहे.
पत्राचाळ
पत्राचाळ किंवा सिद्धार्थ नगर हे गोरेगाव भागात आहे. पत्राचाळीतल्या ६७२ भाडेकरूंना नवे घर मिळावे यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रयत्न करण्यात येत आहेत. हा प्रकल्प म्हाडाने खाजगी विकासकांच्या भागीदारीतून हाती घेतला होता.

५ नोव्हेंबर २०१८ 
धारावीमधील सेक्टर १ ते ५ या सर्व सेक्टर्सचा विशेष हेतू कंपनीच्या माध्यमातून एकत्रित विकास करण्यासंदर्भात शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात आली.
मंजुरीत धारावी अधिसूचित क्षेत्रालगत असलेल्या व धारावी अधिसूचित क्षेत्रातील भारतीय रेल्वेच्या मालकीच्या एकूण अंदाजित ४६ एकर जमिनीच्या उपलब्धतेसंदर्भात रेल्वे मंत्रालयाशी समन्वय साधण्याचा निर्णय घेण्यात आला.ac

२४ फेब्रुवारी २०१९ 
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्या दरम्यान या अनुषंगाने बैठक झाली.
रेल्वे मंत्रालयाने बैठकीत जमीन धारावी पुनर्वसन प्रकल्पातील सेक्टर १ ते ५ च्या विशेष हेतू कंपनीमार्फत एकत्रित विकासाच्या अनुषंगाने उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली.
 

Web Title: BDD, 500 crores to Patrachali, Diwali gift from MHADA, Maharashtra shelter fund to be used

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई