Join us  

‘बीडीडी चाळ पुनर्विकासाचा निर्णय महिनाभरात’

By admin | Published: March 16, 2016 8:37 AM

मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनिर्वकासाबाबत महिन्याभरातच निर्णय घेण्यात येईल, असे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज विधानसभेत सांगितले.

मुंबई : मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनिर्वकासाबाबत महिन्याभरातच निर्णय घेण्यात येईल, असे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज विधानसभेत सांगितले.वरळी, ना.म.जोशी मार्ग, शिवडी आण िनायगाव येथील बीडीडी चाळींच्या पुनिर्वकासाबाबतचा प्रश्न आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला होता. विधानसभा सदस्य अ‍ॅड.आशिष शेलार, कालिदास कोळंबकर, अजय चौधरी, राज पुरोहित, अतुल भातखळकर यांनी या संदर्भातला प्रश्न विचारला होता.वायकर म्हणाले की, बीडीडी चाळींचया पुनिर्वकासाबाबत शासन सकारात्मक असून या संदर्भातला निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत येत्या महिनाभरात घेण्यात येईल. बीडीडी चाळींचा पुनिर्वकास करताना म्हाडा ही नोडल एजन्सी राहणार आहे. मुंबईतील वरळी, ना.म.जोशी मार्ग, शिवडी आण िनायगाव येथील ९३ एकरामध्ये असलेल्या २०७ बीडीडी चाळींचा पुनिर्वकास करताना विकास नियोजन नियमावलीमध्ये काही बदल करण्यात येतील. २०७ बीडीडी चाळीत एकूण १६,५५४ घरे आहेत. पुनर्विकासात सर्वांना सारख्या क्षेत्रफळाची घरे देताना क्षेत्रफळ नेमके किती असावे याचा अभ्यास केला जात आहे, असे वायकर यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)