बीडीडी चाळींच्या पुनर्विकासास वेग

By admin | Published: July 1, 2015 12:41 AM2015-07-01T00:41:05+5:302015-07-01T00:41:05+5:30

मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रक्रियेस म्हाडाने गती दिली असूून, यासाठी इच्छुक विकासकांकडून मास्टर प्लान तयार करण्यासाठी स्वारस्य निविदा मागविल्या आहेत.

BDD chawl redevelopment speed | बीडीडी चाळींच्या पुनर्विकासास वेग

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासास वेग

Next

नारायण जाधव , ठाणे
मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रक्रियेस म्हाडाने गती दिली असूून, यासाठी इच्छुक विकासकांकडून मास्टर प्लान तयार करण्यासाठी स्वारस्य निविदा मागविल्या आहेत. मुंबईतील नायगाव, वरळी आणि ना.म. जोशी मार्गावर ८६.९८ एकर इतक्या विस्तीर्ण क्षेत्रावर या १९५ चाळी ब्रिटिशांनी १९२० ते १९२५ या कालखंडात बांधल्या आहेत. कालौघात त्यांचे बांधकाम जीर्ण झाल्याने त्यात पडझड होत आहे. त्यांच्या दुरुस्तीवर १४० कोटींच्या वर रक्कम खर्च होऊनही त्या दुरुस्त होत नसल्याने तेथील सुमारे १६,२२९ कुटुंंबांचे आहे, त्याच ठिकाणी पुनर्वसन करून त्यांचा पुनर्विकास म्हाडा करणार आहे.
दक्षिण मुंबईतील अतिशय मोक्याच्या ठिकाणी या चाळी असून, मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याचे श्रेय लाटण्यासह त्यांच्या भूखंडाचे श्रीखंड लाटण्यासाठी येत्या काळात विकासकांसह राज्यकर्त्यांत चांगलीच जुंपणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एप्रिल महिन्यात घेतलेल्या एका बैठकीत येथील रहिवाशांची बाजू भक्कमपणे मांडून त्यांना पुनर्विकासात घर देण्याचे मान्य केले होते. रहिवाशांनी शासनाचा प्रस्ताव मान्य केल्यानंतर म्हाडाने आता या १९५ चाळींच्या पुनर्विकासासाठी विकासक आणि वास्तुविशारदांकडून निविदा मागविल्या आहेत.
यासाठी ज्या विकासक, वास्तुविशारदांनी गेल्या ७ वर्षांत २० हेक्टर क्षेत्राचा एक किंवा १२ हेक्टर दोन
प्रकल्प पूर्ण केले आहेत, १ लाख चौरस मीटर क्षेत्राचे बांधकाम केले आहे, ५००० भाडेकरू किंवा झोपडीधारकांचे पुनर्वसन केलेले असावे, या अनुभवासह ३ कोटींची उलाढाल असावी अशा अटी म्हाडाने घातल्या आहेत.

नायगाव, वरळी आणि ना.म. जोशी मार्गावर ८६.९८ एकर क्षेत्रावर या १९५ चाळी ब्रिटिशांनी १९२० ते १९२५ या कालखंडात बांधल्या आहेत. कालौघात त्यांचे बांधकाम जीर्ण झाल्याने त्यात पडझड होत आहे.

चाळींचा परिसरक्षेत्रचाळीकुटुंबे
नायगाव१३.३९ एकर४२३,४९५
ना.म. जोशी मार्ग१३.९० एकर३२२,६०६
वरळी५९.६९ एकर१२११०,१२८
एकूण८६.९८ एकर१९५१६,२२९

Web Title: BDD chawl redevelopment speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.