Join us

बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम सुरू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 4:38 AM

वरळीतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम आता टाटा कॅपेसिटी कंपनीला देण्यात आले आहे.

मुंबई : वरळीतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम आता टाटा कॅपेसिटी कंपनीला देण्यात आले आहे. त्यामुळे आता पुनर्विकासाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईतील नायगांव आणि लोेअर परळमधील ना.म.जोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या पुर्नविकासांच्या कामाला याआधीच प्रत्यक्षपणे सुरवात झाली आहे. मात्र वरळीतील बीडीडी चाळीच्या पुर्नविकासाच्या कामाला अजूनही सुरवात झालेली नाही. वरळीतील बीडीडी चाळींच्या पुर्नविकासाचं काम टाटा कॅपेसिटी कंपनीला दिल्यामुळे या भागातील प्रत्यक्ष कामाला लवकरात लवकर सुरवात होणार आहे.वरळीतील बीडीडी चाळी सोडल्या तर बाकी ठिकाणाच्या बीडीडी चाळींच्या पुर्नविकासाचं काम याआधीच सुरू करण्यात आले होते. या चाळींच्या पुर्नविकासासाठी म्हाडाने गेल्यावर्षी एप्रिलमध्ये जागतिक स्तरावर निविदाही मागवल्या होत्या. या निविदा म्हाडाकडून मागवल्यानंतर टाटा कॅपेसिटी कंपनी आणि अजून दोन कंपन्यांनी आपल्या निविदा म्हाडाकडे सादर केल्या होत्या.या निविदा प्रकियेत म्हाडातील अधिकाऱ्यांच्या घोळामुळे शापुरजी पालनजी कंपनीला आपली निविदा भरता आली नाही असा आरोप करत शापुरजी पालनजी कंपनीने या निर्णय प्रकियेविरोेधात थेट उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असल्याने वरळीतील बीडीडी चाळींच्या पुर्नविकासाच्या कामांना खीळ बसली होती. आम्हांला ही या निविदा प्रकियेत सामील करून घेण्यात यावे यासाठी शापुरजी पालनजी कंपनीने नंतर दाद मागण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायलयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने म्हाडाची निविदा प्रकिया योग्य असल्याचा निकाल दिल्यामुळे पुर्नविकासाचा मार्ग मोकळा झाला. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर म्हाडाने त्यांच्याकडे आलेल्या काही कंपनीच्या निविदा तपासून त्यापैकी टाटा कॅपेसिटी कंपनीला काम दिले. लवकरच काम सुरू होणार असल्याने येथील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे,