Join us

बीडीडीच्या पात्र भाडेकरूंची नोव्हेंबरमध्ये संगणकीय सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 1:48 AM

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.

मुंबई : ना. म. जोशी मार्ग, परळ येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत संक्रमण गाळ्यात स्थलांतरित झालेल्या पात्र भाडेकरूंना प्रस्तावित पुनर्वसित इमारतीतील सदनिका वितरित करण्याकरिता म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. अद्यापपर्यंत १४६ पात्र भाडेकरू/ रहिवाशांचा संक्रमण गाळ्याचा करारनामा पंजीकृत करून त्यांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे.३१ नोव्हेंबरपर्यंत म्हाडाच्या संक्रमण गाळ्यात स्थलांतरित होतील अशा लाभार्थ्यांना म्हाडाच्या संगणकीय सोडतीत समाविष्ट केले जाणार आहे. बीडीडी ना. म. जोशी मार्ग, परळ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील पात्र भाडेकरू (लाभार्थी) समवेत संक्रमण गाळ्याचा करारनामा पंजीकृत करण्याबाबत कार्यवाही करण्याचे काम सुरू आहे.