सावधान ! सैन्यातील जवानांच्या नावाने होतेय तुमची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 11:20 AM2020-01-04T11:20:48+5:302020-01-04T11:21:50+5:30
मुंबईतील युवक सतिश दळवी यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग शेअर केला आहे
मुंबई - देशातील प्रत्येक नागरिकांना सैन्यातील जवानांप्रती आदर आहे. त्यामुळेच, रेल्वे स्थानक, बस स्टँड किंवा विमानतळावर मिल्ट्रीचा गणवेश परिधान केलेला जवान दिसल्यास नकळत आपल्या तोंडातून जय हिंद सर हे शब्द बाहेर पडतात, नकळतच आपला हात सॅल्यूट मारण्यासाठी उंचावला जातो. देशभक्तीचा भावना मनात निर्माण होते. कारण, देशसेवेसाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या या जवानांचा आपणास प्रचंड आदर आहे. मात्र, या जवानांचं नाव घेऊनच फसवणूक करण्यात येत आहे. याबाबत मुंबईतील एका तरुणाने आपला अनुभव शेअर केला आहे.
मुंबईतील युवक सतिश दळवी यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग शेअर केला आहे. त्यामध्ये, सैन्यातील जवानांच्या नावाने कशारितीने फसवणूक केली जाते, हे त्यांनी दाखवून दिलंय. OLX या ऑनलाईन खरेदी-विक्री साईटवरुन ही फसवणूक करण्यात येत होती. त्यामध्ये, मारुती वॅगनार कार विक्री करताना, मी BSF मध्ये नोकरीला असून देशातील जवानांवर तुम्हाला विश्वास नाही का? असे म्हणत भावनिक आवाहन करत फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, सतिश हे जागरूक नागरिक असल्याने त्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर, आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन याचा वृत्तांतही शेअर केला. सतिश यांच्या फेसबुक पोस्टला 4.1 k शेअर्स मिळाले असून तीन हजारांपेक्षा अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.
सतिश आर. दळवी यांची फेसबुक पोस्ट -
27 डिसेंबर 2019