सावधान ! छोटे समारंभही करू शकतात कोरोनाचा मोठा फैलाव, नियमांचे पालन करण्याचे पालिका प्रशासन आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 10:56 AM2020-10-21T10:56:54+5:302020-10-21T10:57:17+5:30

विशेषत: नवरात्रौत्सवात मोठ्या प्रमाणावर सामाजिक अंतराचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र असून मास्क परिधान करण्याबाबतही मुंबईकर निष्काळजीपणा करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी मोनोरेल सुरू झाली. सोमवारी मेट्रो सुरू झाली.

Be careful Even small ceremonies can spread the corona appealing to the municipal administration to follow the rules | सावधान ! छोटे समारंभही करू शकतात कोरोनाचा मोठा फैलाव, नियमांचे पालन करण्याचे पालिका प्रशासन आवाहन

सावधान ! छोटे समारंभही करू शकतात कोरोनाचा मोठा फैलाव, नियमांचे पालन करण्याचे पालिका प्रशासन आवाहन

Next

मुंबई : गणेशोत्सवानंतर मुंबईच्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याचा अनुभव मुंबईकरांनी घेतला. अनलॉक-५ मध्ये बहुतांश व्यवहार पूर्वपदावर येत असले तरी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचेही चित्र आहे. दक्षिण भारतातील चेन्नईमध्ये छोट्या समारंभांनी कोरोनाचा मोठा फैलाव केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर मुंबईत अशा प्रकारचा फैलाव होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

विशेषत: नवरात्रौत्सवात मोठ्या प्रमाणावर सामाजिक अंतराचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र असून मास्क परिधान करण्याबाबतही मुंबईकर निष्काळजीपणा करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी मोनोरेल सुरू झाली. सोमवारी मेट्रो सुरू झाली. बेस्ट तर वेगाने धावत असून, तिच्या मदतीला एसटीही धावत आहे. रिक्षा, टॅक्सीव्यतिरिक्त खासगी वाहने रस्त्यावर उतरत आहेत. गणेशोत्सवानंतर मुंबई आणखी वेगाने धावू लागली आहे. आता नवरात्रौत्सवामुळे वर्दळ वाढली.

सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी मंडपात पोस्टर्स लावले म्हणजे नियम पाळले गेले, असे होत नाही. प्रत्यक्षात कार्यवाही गरजेची असून कार्यकर्त्यांनी आरती करताना मास्क, सामाजिक अंतर राखण्याचा नियम पाळावा. सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन पालिकेने केले.

‘गर्दी टाळा, कोरोनाचे नियम पाळा’
नवरात्रौत्सवाव्यतिरिक्त वाढदिवस किंवा तत्सम कार्यक्रम आयोजित करण्यावर भर दिला जात आहे. अशा कार्यक्रमात एकास जरी कोरोनाची लागण झाल्यास इतरांनाही त्याचा फटका बसू शकतो. परिणामी छोटे समारंभ आयोजित करू नका. गर्दी करू नका. कोरोनाचे नियम पाळा, असे आवाहन सातत्याने मुंबई महापालिका करत आहे.
 

Web Title: Be careful Even small ceremonies can spread the corona appealing to the municipal administration to follow the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.