मुंबई - अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही नागरिकांना काळजी घ्या, प्रशासकीय सूचनांचं पालन करा, असे आवाहन केलंय. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही परिस्थितीसंदर्भात माहिती घेतली असून संबंधित यंत्रणांना सूचना केल्याचे आदित्य यांनी म्हटले. 

निसर्ग चक्रीवादळाच्या वादळाची सद्यस्थिती पाहता आयएमडीने म्हटलं आहे की, पूर्व-मध्य अरबी समुद्रामध्ये तयार झालेला दाबाचा पट्टा मुंबईच्या ५५० किमी, पणजीच्या ३०० किमी, सुरतच्या ७७० किमी दूर आहे. हवामान खात्याने चक्रीवादळाच्या परिस्थितीचा आढावा घेत रात्री अडीच वाजता ही माहिती दिली. मंगळवारी हवेच्या दाबाचा पट्टा आणखी वाढणार असल्याने जवळपास १२ तासाच्या आत समुद्रात तीव्र स्वरुपाचं चक्रीवादळ येणार आहे. चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्रातील हरिहरेश्वर, गुजरातमधील दमन यादरम्यान ३ जूनपर्यंत येण्याची शक्यता वर्तवली आहे.

I request all citizens to follow the instructions of all the local authorities strictly as we prepare for the landfall of the cyclone. More Dos and Donts shall be officially released, locally.

— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 2, 2020

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी परिस्थितीचा आढावा घेतला असून मुंबई महापालिका आयुक्त चहल व संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांशी चर्चा केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही परिस्थितीचा आढवा घेऊन यंत्रणांना सूचना केल्या आहेत. तसेच, निसर्ग वादळाच्या परिस्थितीवर ते नियंत्रण ठेऊन आहेत, असेही आदित्य यांनी म्हटले. त्यासोबतच, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. या कालावधीत काय करावं अन् काय करु नये, यासंदर्भात प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याची विनंतीही आदित्य यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. 

दरम्यान अरबी समुद्रात येणाऱ्या निसर्ग चक्रीवादळामुळे राज्य सरकारसह एनडीएमए, एनडीआरएफ, आयएमडी, भारतीय तटरक्षक दल तैनात करण्यात आलं आहे. या वादळामुळे महाराष्ट्र, गुजरात, दीव-दमन याठिकाणी काही भागांवर मोठा परिणाम होणार आहे. एनडीआरएफने गुजरातमध्ये २ राखीव दलासह १३ टीम आणि महाराष्ट्रात ७ राखीव दलासह १६ टीम तैनात करण्यात आली आहेत. तर दीव-दमन, दादरा-नगरहवेली येथे एक-एक टीम तैनात केली आहे.
 

Web Title: Be careful, follow the instructions, the appeal of the aaditya thackery to the people after the cyclone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.