...म्हणून Googleने play store वरून हटवले 34 धोकादायक ऍप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 10:53 PM2020-10-03T22:53:07+5:302020-10-03T23:06:17+5:30

याबाबत माहिती मिळल्यानंतर गुगलने त्वरित असे ऍप्स प्ले स्टोअरवरून डिलीट केले आहेत.

Be careful! Google has removed 34 dangerous apps from the play store | ...म्हणून Googleने play store वरून हटवले 34 धोकादायक ऍप्स

...म्हणून Googleने play store वरून हटवले 34 धोकादायक ऍप्स

Next

मुंबई : गुगलने जुलै ते सप्टेंबरदरम्यान प्ले स्टोअरवरून( google play store) 34 ऍप्स काढून टाकले आहेत. या 34 ऍप्समध्ये जोकर मालवेयर (joker malware) आढळल्यानंतर गूगलकडून हे पाऊल उचलण्यात आलं. जोकर मालवेअर हा धोकादायक व्हायरस असून गेल्या काही महिन्यांपासून अनेक ऍप्सवर त्याचा परिणाम झाला होता. याबाबत माहिती मिळल्यानंतर गुगलने त्वरित असे ऍप्स प्ले स्टोअरवरून डिलीट केले आहेत.

हा जोकर मालवेयर एक प्रकारचा मॅलिशियस बॉट (malicious bot) आहे, ज्याला fleeceware म्हणून कॅटेगराईज करण्यात आलं आहे.
या मालवेयरचं काम SMSवर खोटं क्लिक करण्याचं असतं, ज्यामुळे युजर्सच्या अकाऊंटमधून नको असलेली प्रीमियम पेड सर्व्हिस सब्सक्राइब होते. याबाबत युजर्सला कोणतीही माहिती नसते. या स्पायवेयरला SMS मेसेज, कॉन्टॅक्ट लिस्ट आणि फोनमधील माहिती चोरण्यासाठी डिझाइन करण्यात आलं आहे. हा मालवेयर युजर्सला छुप्यारितीने, प्रीमियम वायरलेस ऍप्लिकेशन प्रोटोकॉल म्हणजेच WAP सर्व्हिससाठी साईन-अप करून देतो.

>>All Good PDF Scanner

>>Mint Leaf Message-Your Private Message

>>Unique Keyboard – Fancy Fonts & Free Emoticons

>>Tangram App Lock

>>Direct Messenger

>>Private SMS

>>One Sentence Translator – Multifunctional Translator

>>Style Photo Collage

>>Meticulous Scanner

>>Desire Translate

>>Talent Photo Editor – Blur focus

>>Care Message

>>Part Message

>>Paper Doc Scanner

>>Blue Scanner

>>Hummingbird PDF Converter – Photo to PDF

>>All Good PDF Scanner

>>com.imagecompress.android

>>com.relax.relaxation.androidsms

>>com.file.recovefiles

>>com.training.memorygame

>>Push Message- Texting & SMS

>>Fingertip GameBox

>>com.contact.withme.texts

>>com.cheery.message.sendsms (two different instances)

>>com.LPlocker.lockapps

>>Safety AppLock

>>Emoji Wallpaper

>>com.hmvoice.friendsms

>>com.peason.lovinglovemessage

>>com.remindme.alram

>>>Convenient Scanner 2

>>Separate Doc Scanner

गुगलने या मालवेयरची ओळख ‘Bread’ (Joker) म्हणून केली आहे. जो 2017 मधील मोठ्या प्रमाणात बिलिंग फसवणुकीचा ग्रुप आहे. हे ऍप्स फोनमधील डेटासाठी अतिशय धोकादायक आहेत. त्यामुळे गुगलने हे ऍप्स असल्यास त्वरित डिलीट करण्याचं सांगितलं आहे.

Web Title: Be careful! Google has removed 34 dangerous apps from the play store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.