Join us

काळजी घ्या; उष्णतेची लाट येतेय : पारा ४१ ते ४४ अंशावर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 5:19 PM

मे महिन्यात मुंबईसह राज्याचा पारा चांगलाच वाढत असून, बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ४२ ते ४० अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.

 

 

मुंबई : मे महिन्यात मुंबईसह राज्याचा पारा चांगलाच वाढत असून, बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ४२ ते ४० अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. मराठवाडा आणि विदर्भात अनेक शहरांचे कमाल तापमान ४० अंशावर नोंदविण्यात येत असून, आता मध्य भारतात उष्णतेची लाट येईल, असा इशारा देण्यात आला असून, ६ मे रोजी विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.गेल्या २४ तासांत गोव्यासह संपुर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. ६ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ७ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार  वारे वाहतील. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. ८ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार वा-यासह पाऊस पडेल. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. ९ मे रोजी विदर्भात  तुरळक ठिकाणी जोरदार वा-यासह पाऊस पडेल. ६ आणी ७ मे रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २६ अंशाच्या आसपास राहील.  ----------------------येत्या काही दिवसांत हवामानात उल्लेखनीय बदल होतील. मध्य भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील बहुतांश शहरात २ ते ४ दिवस कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येईल. परिणामी उष्णतेच्या लाटा वाहतील.  ----------------------तापलेली शहरेजळगाव ४३.५मालेगाव ४३.२सोलापूर ४२.७उस्मानाबाद ४१.६औरंगाबाद ४१.५परभणी ४४नांदेड ४३.५बीड ४३.३अकोला ४४.९अमरावती ४४.४बुलढाणा ४१.६चंद्रपूर ४४गोंदिया ४३.४नागपूर ४४.८वर्धा ४४.५

टॅग्स :उष्माघातमहाराष्ट्रमुंबईभारत