Join us

सावधान ! राज्यात दिवसभरात तब्बल 8,807 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ

By महेश गलांडे | Published: February 24, 2021 8:12 PM

राज्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांपेक्षा अधिक होता. मात्र, तो आता कमी झाला आहे. राज्यात आज दिवसभरात तब्बल 8,807 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

ठळक मुद्देराज्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांपेक्षा अधिक होता. मात्र, तो आता कमी झाला आहे. राज्यात आज दिवसभरात तब्बल 8,807 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

मुंबई - महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढायला सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर राज्यातील बहुतांश जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कडक निर्बंध लादण्यात येत आहेत. तसेच, जिल्ह्याचे पालकमंत्री बैठका घेऊन कारवाईसाठी योजना आखताना दिसत आहेत. अनेक जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात आज दिवसभरात तब्बल 8,807 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस हा आकडा वाढताना दिसत आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांपेक्षा अधिक होता. मात्र, तो आता कमी झाला आहे. राज्यात आज दिवसभरात तब्बल 8,807 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी वाढलेल्या रुग्णांची संख्या 6 हजारांपेक्षा जास्त होती, तर सोमवारी दिवसभारत 5,210 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली होती. राज्यात आज नवीन 2772 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर, आत्तापर्यंत एकूण 20,08,623 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 59, 358 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.70% झाले आहे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली.  

राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना नियमावली करण्यासंदर्भात पालकमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. तर, नागरिकांनाही मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असून अनेक जिल्ह्यात संचारबंदी व 7 मार्चपर्यंत शाळांना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी रविवारी जनतेशी संवाद साधून राज्यात कडक निर्बंध लादण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आदेशही दिल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे, राज्यात जिल्हा प्रशासन आणि सर्वच जिल्ह्यातील पालकमंत्री पुन्हा सतर्क झाले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनला आहे. राज्यात आज पुन्हा हजारोंच्या संख्येनं रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबईराजेश टोपे