सावधान... अपडेटेड ‘स्किमर’चा धोका वाढतोय! दोघांना अटक : रोमानियन नागरिकांच्या चौकशीतून माहिती उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:59 AM2018-02-28T01:59:04+5:302018-02-28T01:59:04+5:30

‘एटीएम’ फ्रॉडसाठी आता अपडेटेड ‘स्किमर’ वापरले जात असल्याची भीती मुंबई पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. एटीएम स्किमिंगप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन रोमानियन नागरिकांच्या चौकशीदरम्यान ही माहिती समोर आली आहे.

 Be careful ... the risk of updated skimmer is increasing! Both arrested: Explanation of information from Romanian nationals | सावधान... अपडेटेड ‘स्किमर’चा धोका वाढतोय! दोघांना अटक : रोमानियन नागरिकांच्या चौकशीतून माहिती उघड

सावधान... अपडेटेड ‘स्किमर’चा धोका वाढतोय! दोघांना अटक : रोमानियन नागरिकांच्या चौकशीतून माहिती उघड

Next

गौरी टेंबकर-कलगुटकर 
मुंबई : ‘एटीएम’ फ्रॉडसाठी आता अपडेटेड ‘स्किमर’ वापरले जात असल्याची भीती मुंबई पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. एटीएम स्किमिंगप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन रोमानियन नागरिकांच्या चौकशीदरम्यान ही माहिती समोर आली आहे.
सध्या एटीएममध्ये ‘स्किमर’ बसवले जात असून त्यामार्फत कार्ड क्लोनिंग केले जात असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटना वाढत असतानाच आता एटीएममध्ये सहजासहजी लक्षात न येणारे ‘अत्याधुनिक’ स्किमर बसविले जात असल्याची भीती एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने व्यक्त केली आहे. एटीएम स्किमिंगप्रकरणी अटक करण्यात आलेल्या काही रोमानियन नागरिकांच्या चौकशीदरम्यान ही माहिती समोर आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
एटीएममधून पैसे काढण्याच्या घाईत स्किमर किंवा त्यावर बसवलेल्या मायक्रो कॅमेºयाकडे आपले लक्षच जात नाही. बँक खात्यातून पैसे गेल्यानंतर हे लक्षात येते. मात्र तोपर्यंत उशीर झालेला असतो. त्यामुळे पैसे काढताना सावधानता बाळगणे गरजेचे असल्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
‘त्या’ स्किमरबाबत चौकशी सुरू
दहिसरमध्ये अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएममधील स्किमर काढण्यासाठी आलेल्या दोघा रोमानियन नागरिकांना दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडे असलेले स्किमर आम्ही हस्तगत केले आहेत. त्यांनी हे स्किमर नेमके कुठून आणि कसे आणले याची चौकशी आम्ही करत आहोत. रोमानियातील आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने टुरिस्ट व्हिसावर तिथले नागरिक
भारतात येतात आणि
एटीएमना टार्गेट करतात. विदेशी नागरिक असल्याने त्यांच्यावर सहसा कोणी संशय घेत नाही, याचाच ते फायदा घेतात. परंतु असे संशयित सध्या आमच्या रडारवर आहेत.
- डॉ. विनयकुमार राठोड
(पोलीस उपायुक्त, झोन १२)
पिन नंबर कोणालाच सांगू नका
रोमानिया हा देश ‘सेंटर आॅफ कॉम्प्युटर कोडिंग’ म्हणून ओळखला जातो. पुण्यातील चतु:शृंगी पोलिसांनी २०१५ मध्ये तीन रोमानियन नागरिकांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यांनी १ हजार ३० कार्डचा डेटा चोरला होता. यात १३८ बँक खात्यांमधून जवळपास २८ लाख रुपये काढून घेण्यात आले होते. मात्र दहा एफआयआर आणि मजबूत आरोपपत्र असूनदेखील ते तिघे जामिनावर सुटले आणि फरार झाले. अर्थात कायद्यातील खाचखळगे या चोरांच्या चांगलेच परिचयाचे आहेत. तरीही त्यातील दोघांना पुन्हा नवघरप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अपडेटेड स्किमर ओळखणे कठीण आहे. तेव्हा आपले पिन नंबर कोणालाच सांगू नका. आपल्या कार्डची आणि बँकेतील पैशांच्या सुरक्षेची काळजी आपणही घ्यायलाच हवी.
- अ‍ॅड. विशाल सत्यप्रकाश सक्सेना, सायबर क्राइम तज्ज्ञ
अशी घ्या काळजी...
एटीएम आणि रेस्टॉरंट अथवा शॉपिंग मॉलमध्ये आपल्यासोबत स्किमिंग फ्रॉड होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे एटीएममध्ये गेल्यानंतर तिथला ‘कार्ड स्लॉट’ नीट पाहा. तो वर आल्यासारखा, तुटल्यासारखा, अथवा त्याच्या बाजूला काही चिकट गमसारखे डाग लागलेले आढळल्यास तेथून पैसे काढणे टाळा.
अनेकदा या ‘कार्ड स्लॉट’जवळ ‘क्लोज सर्किट’ कॅमेरा तुमचा पिन क्रमांक पाहण्यासाठी बसवण्यात येतो. त्यामुळे पिन क्रमांक टाकताना त्यावर हात ठेवला तर तो कॅमेºयात कैद होणार नाही.

Web Title:  Be careful ... the risk of updated skimmer is increasing! Both arrested: Explanation of information from Romanian nationals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.