मुंबई : मध्य रेल्वने आंबिवली आणि आसनगावदरम्यान पादचारी पुलाच्या गर्डरसाठी ट्रॅफिक ब्लॉक घोषित केला आहे. गुरुवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात आंबिवली स्थानकावर दोन स्टील गर्डर टाकण्यात येणार आहेत. यामुळे ४२ लोकल फे-या रद्द करण्यात येतील. प्रवाशांच्या सुविधेसाठी कल्याण-सीएसएमटी मार्गावर ३० विशेष फे-या चालवण्यात येणार आहेत.
ब्लॉकमुळे वाराणसी-सीएसएमटी महानगरी एक्स्प्रेस आटगाव येथे १२.२७ ते १४.२५ वाजेपर्यंत थांबवण्यात येणार असून दादर स्थानकात तात्पुरत्या स्वरूपात एक्स्प्रेसला शेवटचा थांबा असेल. त्याचबरोबर पाटलीपुत्र-एलटीटी एक्स्प्रेस खर्डी स्थानकावर, सुविधा एक्स्प्रेस कसारा स्थानकावर, गोदान एक्स्प्रेस इगतपुरी स्थानकावर आणि मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेस इगतपुरी स्थानकावर थांबवण्यात येणार आहे. परिणामी या सर्व एक्स्प्रेस गंतव्य स्थानी विलंबाने पोहोचतील.
नागपूर-सीएसएमटी सेवाग्राम एक्स्प्रेस सीएसएमटी ते नाशिक रोड या मार्गादरम्यान धावणार नाही. परिणामी नाशिक रोड येथूनच १८ जानेवारी रोजी सीएसएमटी सेवाग्राम एक्स्प्रेस चालवण्यात येईल.
लोकल फे-या रद्दछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून टिटवाळा-आसनगाव-कसारासाठी निघणा-या डाऊन लोकल सकाळी ९.१२ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत रद्द करण्यात येणार आहेत. तर टिटवाळा-आसनगाव-कसाराहून सीएसएमटीकडे जाणाºया अप लोकल सकाळी ९.५४ ते दुपारी ३.०२ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.मेल-एक्स्प्रेसच्या वेळेत बदलएलटीटी-दरभंगा एक्स्प्रेस १८ जानेवारी रोजी दुपारी १२.१५ वाजता सुटण्याऐवजी दुपारी १ वाजता निघणार आहे. एलटीटी-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस १२.४०ऐवजी १.२० वाजता सुटणार आहे. जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस दुपारी ४ वाजून ४५ मिनिटांनी सुटण्याऐवजी संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुटणार आहे.वाहतूक विभागाच्या प्रधान सचिवांना ब्लॉकबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला ब्लॉक काळात अतिरिक्त बस सोडण्याची विनंती करण्यात आली आहे. ब्लॉक काळात कल्याण-सीएसएमटी, कल्याण-कुर्ला आणि कल्याण ठाणे मार्गावर विशेष फे-या चालविण्यात येणार आहेत.- एस.के. जैन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे