शालेय साहित्य खरेदी करताना काळजी घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 07:42 AM2023-05-31T07:42:33+5:302023-05-31T07:42:53+5:30

बाजारपेठांमधील या शालेय साहित्याच्या खरेदी-विक्रीची उलाढाल कोट्यवधीत आहे.

Be careful when buying school supplies know what care you should take | शालेय साहित्य खरेदी करताना काळजी घ्या!

शालेय साहित्य खरेदी करताना काळजी घ्या!

googlenewsNext

महिन्याच्या पंधरवड्यापासून घराघरांत शालेय साहित्याच्या खरेदीला उधाण येते. मागील काही वर्षांत घराघरांत या खरेदीसाठीचे वेगळे बजेट ठेवावे लागत आहे. बाजारपेठांमधील या शालेय साहित्याच्या खरेदी-विक्रीची उलाढाल कोट्यवधीत आहे. शिक्षण साहित्य खरेदी करताना कोणती काळजी घ्यायची हे पाहूया. 

सीबीएसई तसेच मराठी आणि इंग्रजी माध्यमातील शाळा येत्या महिन्यात सुरू होणार आहेत. आतापासूनच बाजारपेठांमध्ये दप्तर, वह्या, पुस्तके, गणवेश तसेच टिफिन बॉक्स, वॉटरबॅग खरेदीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जुना साठा खरेदी करणे टाळा
बऱ्याच दुकानांत सुरुवातीच्या दिवसात मागील वर्षीचा शैक्षणिक साहित्याचा साठा असतो. अशावेळी बुरशीसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जुने साहित्य घेणे टाळावे. 

साहित्य नेमके कितीला ?
मध्यंतरी पेट्रोल आणि डिझेल यांचे दर वाढल्यामुळे सर्व क्षेत्रांप्रमाणे याही क्षेत्रामध्ये महागाई वाढली होती. पण, सध्या इंधनाचे हे दर कमी आल्यामुळे नवीन आलेल्या शैक्षणिक साहित्याच्या किमती कमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडे दिवस थांबूनच शैक्षणिक साहित्य खरेदी करा. 

शैक्षणिक धोरण काय ?
येणाऱ्या नवीन वर्षामध्ये अभ्यासक्रम ऑनलाइन का ऑफलाइन पद्धतीने शिकविणार आहेत याची खातरजमा करा. त्यामुळे नेमके शैक्षणिक साहित्य किती खरेदी करावे, याचा अंदाज येणे शक्य होईल. 

बोगस कंपन्यांपासून सावधान 
बाजारपेठांमध्ये हलक्या, निकृष्ट दर्जाचा, चायनामधून आलेला साठा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरेदीवेळी जागरूक असणे खूप आवश्यक आहे. असा निकृष्ट साठा मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.

Web Title: Be careful when buying school supplies know what care you should take

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.