हाेऊ शकते फसवणूक; शिवडीतील तरुणाला ४७ हजारांचा गंडा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जेवणाची ऑनलाईन ऑर्डर मागविणे तरुणाला भलतेच महागात पडले आहेत. यात त्याला ४७ हजार रुपये गमाविण्याची वेळ ओढावली आहे. याप्रकरणी आर.ए.के. मार्ग पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवडीत राहणाऱ्या तरुणाने शनिवारी फाेनवरून शिवडीतीलच एका हॉटेलला जेवणाची ऑर्डर दिली. ६३० रुपये बिल झाले. त्याने पैशांबाबत विचारणा करताच, हॉटेलमधील अनोळखी कर्मचाऱ्याने कॅश घेत नसून, ऑनलाईन पैसे पाठविण्यास सांगितले. ऑनलाईन पैसे पाठविण्यासाठी क्रेडिट कार्डची माहिती मागितली. तरुणाने ती देताच पुढे त्याच्या मोबाईलवर ओटीपी क्रमांक आला. त्याने ताे कर्मचाऱ्याला सांगताच त्याच्या खात्यातून एकूण ४७ हजार रुपये काढण्यात आले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने आर.ए.के. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.
.......................................