ऑनलाईन खरेदी करताना सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:06 AM2021-01-18T04:06:55+5:302021-01-18T04:06:55+5:30
देशभरात २२ हजार जणांची फसवणूक, ११ बनावट संकेतस्थळही समोर ऑनलाईन खरेदी करताना सावधान देशभरात २२ हजार जणांची फसवणूक, ११ ...
देशभरात २२ हजार जणांची फसवणूक, ११ बनावट संकेतस्थळही समोर
ऑनलाईन खरेदी करताना सावधान
देशभरात २२ हजार जणांची फसवणूक, ११ बनावट संकेतस्थळेही समोर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ऑनलाईन खरेदीचा वाढता कल लक्षात घेता, मोठ्या प्रमाणात बनावट संकेतस्थळे डोके वर काढत असल्याने फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशाच बनावट संकेतस्थळावरून देशभरातील २२ हजार जणांची फसवणूक करणाऱ्या ठगाला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
‘शॉप्पीस डॉट कॉम’ या संकेतस्थळावरून महिलांचे ड्रेस मेटेरियल, इमिटेशन ज्वेलरी, गृहोपयोगी इत्यादी वस्तूंची विक्री करत असल्याची जाहिरात फेसबुकवरुन देण्यात आली. याच जाहिरातीला बळी पड़ून २२ हजार महिलांसह अन्य ग्राहकांची ७० लाख रूपयांना फसवणूक झाली आहे. मुंबईतल्या तक्रारदाराची या संकेतस्थळावरुन फसवणूक होताच त्याने सायबर पोलिसांकड़े धाव घेतली. याप्रकरणी सायबर पोलिसांनी २१ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.
त्यानुसार सायबर पोलिसांनी अधिक तपास करत आरोपीला सुरत येथून बेड्या ठोकल्या. हा आरोपी संगणक तज्ज्ञ असून, त्याने परदेशात शिक्षण घेतले आहे. आरोपीच्या चौकशीतून आणखीन ११ संकेतस्थळांची माहिती मिळाली. याप्रकरणी सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी करताना ‘कॅश ऑन डिलिव्हरी’वर भर देण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.