गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून सावध राहा

By admin | Published: May 28, 2016 01:57 AM2016-05-28T01:57:21+5:302016-05-28T01:57:21+5:30

महिलांना पोटदुखी, व्हाइट डिस्चार्ज होणे, रक्त जाणे असे त्रास व्हायला लागल्यावर दुर्लक्ष करण्यात येते. अनेकदा महिला अशा प्रकारचा त्रास सांगायला संकोचतात. त्यामुळे त्रास अंगावरच

Be cautious of cervical cancer | गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून सावध राहा

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून सावध राहा

Next

मुंबई : महिलांना पोटदुखी, व्हाइट डिस्चार्ज होणे, रक्त जाणे असे त्रास व्हायला लागल्यावर दुर्लक्ष करण्यात येते. अनेकदा महिला अशा प्रकारचा त्रास सांगायला संकोचतात. त्यामुळे त्रास अंगावरच काढतात आणि दुखणे वाढते तेव्हा औषधोपचारास सुरुवात करतात. त्यामुळे स्तनाच्या, गर्भाशयाच्या व मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण महिलांमध्ये वाढताना दिसत आहे. जगातील महिला कर्करोग रुग्णांपैकी ५० टक्के महिला भारतीय असल्याचे सावित्रीबाई फुले स्त्री संसाधनच्या सचिव डॉ. कामाक्षी भाटे यांनी सांगितले.
महिला कुटुंब, नोकरी यात स्वत:ला गुरफटून घेतात. त्यामुळे अनेकदा होणारा त्रास घरच्यांपासूनही लपवतात. योनी भागात होणारा त्रास अनेकदा स्पष्टपणे बोलून दाखवण्यास संकोच करतात. पण त्यामुळे महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. देशात महिलांना होणाऱ्या कर्करोगात ८० टक्के कर्करोग हा गर्भाशयाच्या मुखाचा आहे. त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे.
डॉ. भाटे यांनी सांगितले, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर सहज औषधोपचार उपलब्ध असून हा कर्करोग बरा होऊ शकतो. या आजाराचे लवकर निदान होणे अत्यंत गरजेचे आहे. पण अनेकदा महिलांनी आरोग्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे आणि संकोचामुळे आजार तिसऱ्या पायरीपर्यंत पोहोचल्यावर निदान होते. या पातळीवर आजार पोहोचल्यावर निदान झाल्यास कर्करोग बरा होण्याचा प्रमाण अत्यल्प आहे. तीन अथवा पुढच्या पायरीवर गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग पोहोचल्यावर मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग बरा होत असूनही लक्ष न दिल्यामुळे महिलांना या कर्करोगामुळे जीव गमवावा लागत आहे, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे.
महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती होण्याची आवश्यकता आहे. कोणताही त्रास जाणवू लागल्यावर महिलांना त्रास अंगावर काढणे योग्य नाही. गुप्तरोग क्लिनिकमध्ये येणाऱ्या रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण हे पुरुष असतात.
पुरुषांना गुप्तरोगाचा संसर्ग झाला असल्यास त्यांच्या पत्नीची तपासणी करणे आवश्यक असते. पण त्यांच्या तपासण्या होत नाहीत आणि या महिलांना संसर्ग झाला असेल तर तो पसरतो. महिलांचे आरोग्य यामुळे खालावते. महिलांना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक महिलेने वयाच्या तिशीनंतर दरवर्षी पॅप स्मिअर तपासणी करून घेणे आवश्यक आहे, असे डॉ. भाटे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

संकोचामुळे त्रास लपविला जातो
महिला कुटुंब, नोकरी यात स्वत:ला गुरफटून घेतात. त्यामुळे अनेकदा होणारा त्रास घरच्यांपासूनही लपवतात. योनी भागात होणारा त्रास अनेकदा स्पष्टपणे बोलून दाखवण्यास संकोच करतात. पण त्यामुळे महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.देशात महिलांना होणाऱ्या कर्करोगात ८० टक्के कर्करोग हा गर्भाशयाच्या मुखाचा आहे.

Web Title: Be cautious of cervical cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.