जन्म असो वा मृत्यू; प्रमाणपत्रासाठी खेटे तर घालावेच लागणार; महापालिकेचा कारभार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 12:43 AM2020-11-10T00:43:19+5:302020-11-10T00:43:31+5:30

अधिकाऱ्यांना शहानिशा करण्यास तेवढा वेळ लागताे

Be it birth or death; You have to wear a hat for the certificate | जन्म असो वा मृत्यू; प्रमाणपत्रासाठी खेटे तर घालावेच लागणार; महापालिकेचा कारभार

जन्म असो वा मृत्यू; प्रमाणपत्रासाठी खेटे तर घालावेच लागणार; महापालिकेचा कारभार

googlenewsNext

मुंबई : माणसाचा जन्म झाल्यापासून मृत्यू होईपर्यंत प्रत्येक  सरकारी दाखले मिळविण्यासाठी त्याला प्रशासकीय कार्यालयात खेटे घालावे लागतात. 

उंबरठे झिजवावे लागतात. पाय-या झिजवाव्या लागतात. आता २१ व्या शतकात तरी यात काही बदल झाला असेल, प्रशासन टेक्नोसॅव्ही झाले असेल असे वाटत असले तरी ते कागदोपत्री आहे. प्रत्यक्षात अनेक दाखल्यांसाठी विशेषत: जन्म, मृत्यूचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नागरिकांना आजही मुंबई महापालिकेच्या कार्यालयात खेटे घालावे लागत असून, प्रत्येकवेळी कोणत्या कोणत्या तरी अडचणीमुळे प्रमाणपत्र/दाखला मिळविण्याची प्रक्रिया लांबतच जाते. सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत अर्ज करून, शुल्क भरून प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊ न शकतात.

 आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत. सध्याचे युग डिजिटल आहे. अशा वेळी जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जर नागरिकाला कार्यालय गाठावे लागत असेल तर ही खेदाची बाब आहे. केवळ हीच कागदपत्रे नाहीत प्रत्येक कागद ऑनलाईन मिळण्याची तरतूद केली पाहिजे. 
- राकेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते 

हॉस्पिटलने मनपास कळविल्यानंतर ५ दिवसात जन्म किंवा मृत्यू दाखल मनपा कार्यालयात मिळू शकतो. तसेच हे दाखले तुम्ही बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या २४ वॉर्डमध्ये कुठेही कार्यालयीन वेळेत प्राप्त करू शकता. सुविधा केवळ २०१६ नंतर जन्म तसेच मृत्यु पावलेल्या नागरिकांसाठी आहे.  
- विनोद घोलप, आरटीआय कार्यकर्ते 

२१ दिवसांत नोंद व्हावी
जन्म व मृत्यूची नोंद घटना घडल्यापासून २१ दिवसांच्या आत करणे बंधनकारक आहे. जन्म व मृत्यूची घटना रुग्णालय अथवा घरी झाल्यास, सदर क्षेत्र महापालिकेच्या ज्या विभागाच्या अखत्यारित येते त्या संबंधित विभाग कार्यालयात जन्म व मृत्यूची नोंद करण्यात येते. नागरी सुविधा केंद्रात ही नोंद करता येते. 

Web Title: Be it birth or death; You have to wear a hat for the certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई