मुंबई : ‘बीच प्लीज’ मोहिमेंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी दादर चौपाटीच्या स्वच्छतेचा ध्यास घेतला आहे. गेले ३० आठवडे परिश्रम करीत त्यांनी अंदाजे ११० टन कचरा काढला आहे. रविवारी (८ एप्रिल) या मोहिमेचा ३१वा आठवडा पार पडला. या वेळी सकाळी ९ ते ११ दरम्यान तीन टन कचरा उचलण्यात आला. या वेळी ६० स्वच्छतादूत मोहिमेत सहभागी झाले होते. जमा झालेल्या कचऱ्यांमध्ये ९० टक्के कचरा हा प्लॅस्टिकचा आहे. दर रविवारी या मोहिमेंतर्गत कचरा उचलण्यासाठी महापालिकेकडून मदत मिळते, अशी माहिती ‘बीच प्लीज’ मोहिमेचे संस्थापक मल्हार कळंबे यांनी दिली. दरम्यान, युवासेनेच्या राज्य सचिव दुर्गा भोसले-शिंदे, जे.जे. ट्रस्टचे संचालक विशाल कपाडिया यांनी मोहिमेला हातभार लावला.
दादर चौपाटीच्या स्वच्छतेसाठी ‘बीच प्लीज’ने घेतला पुढाकार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 2:18 AM