Join us

मुंबईच्या समुद्रकिनारी लाटांचे तांडव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 6:44 AM

शुक्रवारसह शनिवारी मुंबईच्या समुद्र किनारी उसळलेल्या लाटांनी रविवारीही आपला मारा कायम ठेवला.

मुंबई : शुक्रवारसह शनिवारी मुंबईच्या समुद्र किनारी उसळलेल्या लाटांनी रविवारीही आपला मारा कायम ठेवला. रविवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास मुंबईच्या समुद्र किनारी विशेषत: मरिन ड्राइव्ह परिसरात साडेचार मीटर उंचीहून अधिक उंचीच्या लाटा उसळल्या. परिणामी, मुसळधार पाऊस आणि महाकाय लाटा, अशा दुहेरी वातावरणाने मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर निर्माण झालेल्या वातावरणाने पर्यटकांना काही काळ धडकीच भरली होती.मागील दोन दिवसांपासून समुद्राला भरती आहे. त्यामुळे शुक्रवारसह शनिवारी मुंबईच्या समुद्र किनारी महाकाय लाटा उसळल्या. उसळलेल्या लाटांची उंची साडेचार मीटरहून अधिक होती. समुद्रात फेकलेला कचरा या लाटांनी साभार परत केला. परिणामी, मुंबईच्या समुद्र किनाºयांवर म्हणजे मरिन ड्राइव्ह, दादर, माहिम, जुहू आणि वर्सोवा येथे दोन दिवसांत गोळा झालेला सुमारे तीनशे मेट्रिक टन एवढा कचरा महापालिकेला उचलावा लागला.रविवारीही दुपारी पावणे दोनच्या सुमारास समुद्राला मोठी भरती होती. या काळात मुंबईच्या समुद्र किनारी साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळल्या.>थरार अनुभवण्यासाठी गर्दीबोर्डी : या मोसमातील सर्वाधिक उंचीच्या लाटा रविवारी उसळल्याने, सागराने रौद्ररूप धारण केले होते. हा थरार अनुभवण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. दरम्यान, लाटांसह आलेल्या कचºयाने किनाºयास बकालपणा आला आहे. किनारपट्टीवरील अनेक वस्त्या आणि गावात उधाणाचे पाणी शिरल्याने, अनेक घरांची पडझड झाली आहे.मागील तीन दिवसांपासून सर्वत्र उधाणांच्या लाटांचीच चर्चा आहे. रविवार १५ जुलै रोजी या मोसमातील सर्वात अधिक उंचीच्या उसळणाºया लाटा पाहण्यासाठी दुपारी १ वाजल्यापासून नागरिक किनाºयाकडे वळले. त्यामुळे डहाणू बोर्डी या प्रमुख राज्यमार्गावर वाहनांची गर्दी वाढून वाहतूक धिमी झाली. दोन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास नरपडच्या आंबेवाडी फरशीवर आदळणाºया लाटा आणि मुसळधार पावसात भिजण्याची मजा रस्त्यावर उभे राहून लुटणाºया पर्यटकांमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. स्थानिकांनी पुढाकार घेतल्याने, ही कोंडी सुटण्यास मदत झाली. या ठिकाणी तीनशेपेक्षा अधिक पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यापैकी काही अविवेकी पर्यटक जुन्या फरशीकडे वळले, तेथे लाटांची तीव्रता अधिक असल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली होती.