मुंबई : जुहू पोलिसांनी ५ मे रोजी बॉलीवूड सेलिब्रिटी फॅशन डिझायनर अर्चना कोचरसह चार जणांविरुद्ध विनयभंगासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अर्चना, राजीव कोचर, सिमरन कोचर आणि बाउन्सर नगमा, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
जुहू स्कीम येथे असलेल्या आझाद नगर साईकृपा इमारतीत तक्रारदार महिलेच्या वडिलांचा फ्लॅट होता. तिने दावा केला की, २०१८ मध्ये वडिलांनी त्यांच्या मृत्युपत्रात साईकृपा इमारतीचा दुसरा मजला दिला होता. ज्यामुळे तिच्या भावासोबत तिचा वाद झाला आणि ते प्रकरण आता न्यायालयात प्रलंबित आहे. २८ एप्रिल रोजी सकाळी १०:३० वाजता प्रियाचा भाऊ राजीव आणि त्याची २५ वर्षीय मुलगी सिमरन दुसऱ्या मजल्यावर कार्यालयातील कर्मचाऱ्यांसोबत आले आणि त्यांनी तक्रारदाराच्या घरातील सामान हलवण्यास सुरुवात केली.
जेव्हा तक्रारदार सोफ्यावर बसली, तेव्हा तिच्या भावाने तिला घर सोडण्यास सांगितले, तेव्हा ते घर तिच्या मालकीचे आहे, कारण ते त्यांना त्यांच्या वडिलांनी दिले होते. राजीवने पत्नी अर्चनाला फोन करून साईकृपा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर तिच्या नगमा बाउन्सरला पाठवण्यास सांगितली. नगमा तिथे आली आणि तिने तक्रारदाराचे केस ओढून तिला मारहाण करून धमकावले. इतकेच नव्हेतर नगमाने तिची ओढणी आणि गाऊन ओढल्यामुळे फाटला. तक्रारदाराचा भाऊ आणि त्याच्या मुलीने नगमाला मारहाण करण्यास सांगितल्याचा आरोप आहे.