रहिवाशांच्या सतर्कतेमुळे गुंड गजाआड

By admin | Published: August 14, 2015 02:03 AM2015-08-14T02:03:07+5:302015-08-14T02:12:22+5:30

खंडणीसाठी एका स्थानिक गुंडाने व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री चेंबूर येथे घडली. मात्र रहिवाशांनी सतर्कता दाखवत

Because of the alertness of the residents, | रहिवाशांच्या सतर्कतेमुळे गुंड गजाआड

रहिवाशांच्या सतर्कतेमुळे गुंड गजाआड

Next

मुंबई : खंडणीसाठी एका स्थानिक गुंडाने व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री चेंबूर येथे घडली. मात्र रहिवाशांनी सतर्कता दाखवत या गुंडाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी आज त्याच्या इतर साथीदारांनादेखील अटक केली.
चेंबूरच्या पी.एल. लोखंडे मार्गावर राहणारे रणजीत सिंह यांचे या परिसरात टाईल्सचे दुकान आहे. बुधवारी रात्री एक कार त्यांच्या दुकानासमोर येऊन उभी राहिली. कारमधून आलेल्या इसमाने त्याच्याकडे असलेल्या तलवारीने सिंह यांच्यावर दोन वार केले. ही बाब त्यांच्या दुकानात बसलेल्या नबीन गुप्ता यांच्या लक्षात आल्यांतर त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे परिसरातील रहिवाशांनी दुकानाकडे धाव घेत अक्रम शेख या आरोपीला पकडले. मात्र त्याच्या पाच साथीदारांनी पळ काढला. रहिवाशांनी पोलिसांना ही बाब सांगितल्यानंतर घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर चौकशीत त्याने आरिफ शेख, शाहिद अब्दुल आणि अजिज सलमान या तीन साथीदारांची नावे पोलिसांनी सांगितली. त्यानुसार पोलिसांनी या तिघांनादेखील अटक केली आहे. आणखी दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून हे आरोपी व्यापाऱ्यांना धमकावत त्यांच्याकडून खंडणी वसुली करत आहेत. याबाबत अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. मात्र पोलीस याबाबत काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Because of the alertness of the residents,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.