मुंबईत बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या स्थापनेस स्थानिकांचा विरोध, हे दिले कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 10:50 PM2021-01-19T22:50:08+5:302021-01-19T22:50:59+5:30

Balasaheb Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाजवळील चौकात स्थापन करण्यात येणार आहे.

This is because the locals oppose the installation of a statue of Balasaheb Thackeray in Mumbai | मुंबईत बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या स्थापनेस स्थानिकांचा विरोध, हे दिले कारण

मुंबईत बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या स्थापनेस स्थानिकांचा विरोध, हे दिले कारण

Next

मुंबई - मुंबई आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं खास असं नातं आहे. मात्र याच मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या स्थापनेस विरोध होत असल्याचे समोर आले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाजवळील चौकात स्थापन करण्यात येणार आहे. मात्र या पुतळ्याच्या उभारणीस आपली मुंबई संस्था आणि काही स्थानिकांकडून विरोध करण्यात येत आहे.

दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाजवळील चौकात स्थापन करण्यात येणाऱ्या बाळासाहेबांच्या या पुतळ्यामुळे त्या ठिकाणी गर्दी होऊ शकते. तिथे उभे राहून सेल्फी घेण्यासाठी लोक गर्दी करू शकतात. त्यामुळे अपघात होऊ शकतात, असा दावा आपली मुंबई या संस्थेने केला आहे.

मात्र असे असले तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी मुंबईत करण्यात आली आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण मनसेप्रमुख राज ठाकरे तसेच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही देण्यात आले आहे.

Web Title: This is because the locals oppose the installation of a statue of Balasaheb Thackeray in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.