मुंबई : रिलायन्स ग्रुप आॅफ कंपनीच्या इशा बिल्डटेक व इशा इन्फ्राटेकच्या संचालकपदी असताना मुकेश शहाने (५७) दुरुस्तीच्या नावे १७ कोटींची फसवणूक केली. या आरोपाखाली त्याला अटक झाली असून त्याची प्रेयसी मेहबुबा खान (५६) हिलाही मंगळवारी पोलिसांनी अटक केली.शहा १९८८ मध्ये रिलायन्स ग्रुपमध्ये इशा बिल्डटेकच्या संचालकपदी रुजू झाला. २०१२ मध्ये इशा इन्फ्राटेकची जबाबदारीही त्याच्यावर सोपविण्यात आली. तो घाटकोपरमध्ये पत्नीसोबत राहतो. त्याने अंबानी कुटुंबीय राहत असलेल्या इमारतीच्या डागडुजीसाठी कंपनीच्या नावे १७ कोटींचा अपहार केला. त्यानंतर अचानक राजीनामा दिला.सप्टेंबर २०१८ मध्ये तो मीरा रोड येथे राहणाऱ्या प्रेयसीच्या घरी ओळख लपवून राहू लागला. पत्नीने तो हरवल्याची तक्रार घाटकोपर पोलीस ठाण्यात दाखल केली होती.तो बेपत्ता झाल्याने रिलायन्स ग्रुपच्या वरिष्ठांना संशय आला. तपासणीत डागडुजी न करता त्याने कोटींची अफरातफर केल्याचे समोर आले. त्यांनी कफपरेड पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तपासाअंती शनिवारी त्याला अटक केली. चौकशीत त्याने प्रेयसीवर पैसे खर्च करण्यासाठी अपहार केल्याचे समोर आले. तो तिच्याकडेच ओळख लपवून राहत असल्याने तिलाही मंगळवारी प्रेयसीलाही अटक झाली. तिच्या घरातून तब्बल ७५ लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.
प्रेयसीसाठी रिलायन्सचा माजी संचालक बनला ठग; १७ कोटींची अफरातफर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 3:22 AM