मुंबईत वॉर्ड वॉर रुममार्फत खाटा आणि रुग्णवाहिकेचे नियोजन; 'हे' आहेत विभागनिहाय संपर्क क्रमांक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 07:42 PM2022-01-06T19:42:00+5:302022-01-06T19:42:37+5:30
दररोजच्या बाधितांपैकी पाच टक्केच रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याचा पालिकेचा दावा आहे. मात्र रुग्ण संख्या दररोज २० ते ३० टक्के वाढत असल्याने जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर दररोजची रुग्ण संख्या २० हजारांवर असेल, असा अंदाज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई -
दररोजच्या बाधितांपैकी पाच टक्केच रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याचा पालिकेचा दावा आहे. मात्र रुग्ण संख्या दररोज २० ते ३० टक्के वाढत असल्याने जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर दररोजची रुग्ण संख्या २० हजारांवर असेल, असा अंदाज आहे. त्यामुळे महापालिकेने विभागस्तरावरील वॉर रुममार्फत खाटांचे नियोजन सुरु केले आहे. खाटांचे वितरण व रुग्णवाहिकेची व्यवस्थेसाठी याबाबत नागरिकांमध्ये मदत करण्यासाठी पालिकेने वॉर रुमशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
कोविडच्या पहिल्या लाटेदरम्यान रुग्णांना खाटा मिळण्याची समस्या निर्माण झाल्याने महापालिकेने प्रत्यके विभागस्तरावर वॉर रुमची स्थापना केली. मुंबईतील २४ प्रशासकीय विभागातील या वॉर रुममार्फत कोविड रुग्णांचे मार्गदर्शन, खाटांचे नियोजन, रुग्णवाहिका उपलब्ध करणे तसेच होम क्वारंटाईन रुग्णांच्या आरोग्याची विचारपूस करणे आदी काम केले जात आहे. दुसऱ्या लाटेचा प्रसार नियंत्रणात आल्यानंतर वॉर रुमवरील ताण कमी झाला होता. मात्र आता पुन्हा हे वॉर रुम रुग्णांच्या मदतीसाठी सज्ज झाले आहे. या वॉर रुमचे संपर्क क्रमांक पालिकेने सुधारित क्रमांक जाहीर केले आहेत.
विभाग... संपर्क क्रमांक
ए ..कुलाबा, फोर्ट... ०२२-२२७००००७
बी... डोंगरी... ०२२-२३७५९०२३/४/५/६/७/ ९८२०८५५६२०
सी...मरीन लाईन्स... ०२२-२२१९७३३१
डी ... ग्रँट रोड, मलबार हिल... ०२२-२३८३५००४/८८७९७१३१३५
इ... भायखळा... ०२२-२३७९७९०१
एफ दक्षिण.. परळ... ०२२-२४१७७५०७/८६५७७९२८०९
एफ उत्तर... सायन -माटुंगा... ०२२२४०११३८०/ ८८७९१५०४४७/ ८८७९१४८२०३
जी दक्षिण ... वरळी, प्रभादेवी... ०२२२४२१९५१५/७२०८७६४३६०
जी उत्तर... धारावी, दादर, माहीम... ०२२२४२१०४४१/८२९११६३७३९
एच पूर्व... सांताक्रुज, खार... ०२२-२६६३५४००
एच पश्चिम ... वांद्रे पश्चिम - ०२२-२६४४०१२१
के पूर्व जोगेश्वरी, अंधेरी पूर्व - ०२२-२६८४७०००
के पश्चिम - अंधेरी पश्चिम - ०२२- २६२०८३८८/८५९१३८८२४३
पी दक्षिण - गोरेगाव .. ०२२-२८७८०००८/७३०४७७६०९८
पी उत्तर ...मालाड ... ०२२-२८४४०००१/ ६९६०००००
आर दक्षिण... कांदिवली... ०२२-२८०५४७८८/८८२८४९५७४०
आर उत्तर.. दहिसर ... ०२२-२८९४७३५०
आर मध्य - बोरिवली ... ०२२-२८९४७३६०/९९२००८९०९७
एल - कुर्ला - ७६७८०६१२७४/७३०४८८३३५९
एम पूर्व - मानखुर्द, गोवंडी - ०२२-२५५२६३०१
एम पश्चिम - चेंबूर - ०२२-२५२८४०००/८५९१३३२४२१
एन- घाटकोपर - ०२२-२१०१०२०१/ ७२०८५४३७१७
एस ..भांडुप ... ०२२-२५९५४०००/९००४८६९६६८
टी.. मुलुंड ... ०२२-२५६९४०००/८५९१३३५८२२