Join us

मुंबईत वॉर्ड वॉर रुममार्फत खाटा आणि रुग्णवाहिकेचे नियोजन; 'हे' आहेत विभागनिहाय संपर्क क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2022 7:42 PM

दररोजच्या बाधितांपैकी पाच टक्केच रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याचा पालिकेचा दावा आहे. मात्र रुग्ण संख्या दररोज २० ते ३० टक्के वाढत असल्याने जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर दररोजची रुग्ण संख्या २० हजारांवर असेल, असा अंदाज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई -दररोजच्या बाधितांपैकी पाच टक्केच रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याचा पालिकेचा दावा आहे. मात्र रुग्ण संख्या दररोज २० ते ३० टक्के वाढत असल्याने जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर दररोजची रुग्ण संख्या २० हजारांवर असेल, असा अंदाज आहे. त्यामुळे महापालिकेने विभागस्तरावरील वॉर रुममार्फत खाटांचे नियोजन सुरु केले आहे. खाटांचे वितरण व रुग्णवाहिकेची व्यवस्थेसाठी याबाबत नागरिकांमध्ये मदत करण्यासाठी पालिकेने वॉर रुमशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 

कोविडच्या पहिल्या लाटेदरम्यान रुग्णांना खाटा मिळण्याची समस्या निर्माण झाल्याने महापालिकेने प्रत्यके विभागस्तरावर वॉर रुमची स्थापना केली. मुंबईतील २४ प्रशासकीय विभागातील या वॉर रुममार्फत कोविड रुग्णांचे मार्गदर्शन, खाटांचे नियोजन, रुग्णवाहिका उपलब्ध करणे तसेच होम क्वारंटाईन रुग्णांच्या आरोग्याची विचारपूस करणे आदी काम केले जात आहे. दुसऱ्या लाटेचा प्रसार नियंत्रणात आल्यानंतर वॉर रुमवरील ताण कमी झाला होता. मात्र आता पुन्हा हे वॉर रुम रुग्णांच्या मदतीसाठी सज्ज झाले आहे. या वॉर रुमचे संपर्क क्रमांक पालिकेने सुधारित क्रमांक जाहीर केले आहेत. 

विभाग... संपर्क क्रमांक ए ..कुलाबा, फोर्ट... ०२२-२२७००००७बी... डोंगरी... ०२२-२३७५९०२३/४/५/६/७/ ९८२०८५५६२०सी...मरीन लाईन्स... ०२२-२२१९७३३१डी ... ग्रँट रोड, मलबार हिल... ०२२-२३८३५००४/८८७९७१३१३५इ... भायखळा... ०२२-२३७९७९०१एफ दक्षिण.. परळ... ०२२-२४१७७५०७/८६५७७९२८०९एफ उत्तर... सायन -माटुंगा... ०२२२४०११३८०/ ८८७९१५०४४७/ ८८७९१४८२०३जी दक्षिण ... वरळी, प्रभादेवी... ०२२२४२१९५१५/७२०८७६४३६०जी उत्तर... धारावी, दादर, माहीम... ०२२२४२१०४४१/८२९११६३७३९एच पूर्व... सांताक्रुज, खार... ०२२-२६६३५४००एच पश्चिम ... वांद्रे पश्चिम - ०२२-२६४४०१२१के पूर्व जोगेश्वरी, अंधेरी पूर्व - ०२२-२६८४७०००के पश्चिम - अंधेरी पश्चिम - ०२२- २६२०८३८८/८५९१३८८२४३पी दक्षिण - गोरेगाव .. ०२२-२८७८०००८/७३०४७७६०९८पी उत्तर ...मालाड ... ०२२-२८४४०००१/ ६९६०००००आर दक्षिण... कांदिवली... ०२२-२८०५४७८८/८८२८४९५७४०आर उत्तर.. दहिसर ... ०२२-२८९४७३५०आर मध्य - बोरिवली ... ०२२-२८९४७३६०/९९२००८९०९७एल - कुर्ला - ७६७८०६१२७४/७३०४८८३३५९एम पूर्व - मानखुर्द, गोवंडी - ०२२-२५५२६३०१एम पश्चिम - चेंबूर - ०२२-२५२८४०००/८५९१३३२४२१एन- घाटकोपर - ०२२-२१०१०२०१/ ७२०८५४३७१७एस ..भांडुप ... ०२२-२५९५४०००/९००४८६९६६८टी.. मुलुंड ... ०२२-२५६९४०००/८५९१३३५८२२

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्या