बीडची बुुरखाधारी मोबाइल चोर जेरबंद

By admin | Published: March 26, 2017 05:51 AM2017-03-26T05:51:51+5:302017-03-26T05:51:51+5:30

लोकलमधल्या गर्दीत बुरख्याचा आधार घेत मोबाइल चोरी करणाऱ्या बीडच्या सराईत

Beedi Budhakhadi Mobile Thief Jerband | बीडची बुुरखाधारी मोबाइल चोर जेरबंद

बीडची बुुरखाधारी मोबाइल चोर जेरबंद

Next

मुंबई : लोकलमधल्या गर्दीत बुरख्याचा आधार घेत मोबाइल चोरी करणाऱ्या बीडच्या सराईत महिला चोराचे बिंग निर्भया पथकाने फोडले. सुनीता जानू (३०) असे महिला चोराचे नाव असून, तिच्याकडून साडीत लपविलेले पाच मोबाइल जप्त केले आहेत.
मूळची बीडची रहिवासी असलेली सुनीता मुंबईतले चर्चगेट, सीएसटी, दादर, अंधेरी, वांद्रे, घाटकोपर, बोरीवली, कुर्ला यांसारखी गर्दीची रेल्वे स्थानके गाठते. यापूर्वी तिला अटक झाली होती. त्यामुळे तिने बुरख्याचा आधार घेत मोबाइल चोरी सुरू केली. गेल्या काही दिवसांत पश्चिम रेल्वेवर मोबाइल चोरीच्या तक्रारी वाढत असल्याने निर्भया पथकातील पोलीस नाईक मीनल गिरी यांच्या टीमने याचा अधिक तपास सुरू केला. त्यानंतर सुनीता मुंबई सेंट्रल येथे येणार असल्याची माहिती गिरी यांना मिळाली.
त्यानुसार एपीआय जी. बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली गिरी यांच्या पथकाने सापळा रचला. त्यात एका बुरखाधारी महिलेच्या संशयास्पद हालचाली त्यांनी हेरल्या. तिचा चेहरा दिसत नसल्याने महिलेची थेट चौकशी करणे शक्य नव्हते. त्यांनी तिच्यावर पाळत ठेवली. अखेर बराच वेळाने सुनीता चेहऱ्यावरचा बुरखा हटवताच गिरीने तिला ताब्यात घेतले. तिच्या झडतीतून पाच मोबाइल जप्त करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Beedi Budhakhadi Mobile Thief Jerband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.