Join us

‘गिव्ह वे टू अ‍ॅम्ब्युलन्सला सुरुवात

By admin | Published: December 30, 2016 3:00 AM

‘रुग्णवाहिकांना वाट द्या, आपली वाहने डाव्या बाजूला हळू चालवा’ या मोहिमेचे उद्घाटन वैध मापन शास्त्र विभाग, पेट्रोलपंप असोसिएशन, फामफेडा व राधी फाउंडेशन

मुंबई : ‘रुग्णवाहिकांना वाट द्या, आपली वाहने डाव्या बाजूला हळू चालवा’ या मोहिमेचे उद्घाटन वैध मापन शास्त्र विभाग, पेट्रोलपंप असोसिएशन, फामफेडा व राधी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी मंत्रालय येथे करण्यात आले.या वेळी अमिताभ गुप्ता विशेष पोलीस महानिरीक्षक तथा नियंत्रक, वैध रुग्णांना अती तातडी व गंभीर प्रसंगी रुग्णालयात पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिका रुग्णालयात वेळेत पोहोचविणे गरजेचे असते. प्रत्येकाचे जीवन हे मौल्यवान असल्याने, रुग्णवाहिकांना मोकळी वाट देण्याच्या चळवळीमध्ये प्रत्येक वाहन चालकाने सहभागी होणे गरजेचे आहे. याकरिता ‘रुग्णवाहिकांना वाट द्या’ या मोहिमेंर्तगत पत्रके, तसेच पेट्रोलपंपवर पोस्टर्स व बॅनर्स लावण्यात आले.या वेळी या उपक्रमामध्ये सर्वच लोकांना सहभागी होण्यासाठी फेसबुकवर ॠ्र५ी ६ं८ ३ङ्म अ‍ेु४’ंल्लूी या पेजची निर्मिती केली असून, टिष्ट्वटरद्वारे या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. (प्रतिनिधी)