Join us

ही मेक इन महाराष्ट्रची सुरुवात

By admin | Published: April 10, 2016 3:09 AM

जगभरात अ‍ॅल्युमिनियमच्या व्यावसायिक बोटी निर्यात करणारी मरिन फ्रंटीयर्स ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य कंपनी आहे. आपण जे मेक इन इंडिया म्हणतो, मेक इन महाराष्ट्र

अ‍ॅल्युमिनियम बोटनिर्मिती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटनअलिबाग : जगभरात अ‍ॅल्युमिनियमच्या व्यावसायिक बोटी निर्यात करणारी मरिन फ्रंटीयर्स ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य कंपनी आहे. आपण जे मेक इन इंडिया म्हणतो, मेक इन महाराष्ट्र म्हणतो त्याची ही खरी सुरुवात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.पीएनपी ग्रुपच्या मरिन फ्रंटीयर्सने नेदरलँड येथील खासगी कंपनीसाठी ९० टक्के भारतीय बनावटीच्या भारतातील सर्वात मोठ्या अशा अ‍ॅल्युमिनियमच्या व्यावसायिक बोटीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत गेटवे आॅफ इंडिया येथे करण्यात आले. या वेळी शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, पीएनपी मरिन फ्रंटीयर्सचे संचालक नृपाल पाटील, माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील, आ. पंडित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.तब्बल ३६ मीटर लांबीची गस्ती नौका अलिबाग तालुका, रायगड जिल्हा, नव्हे तर अख्ख्या देशाला अभिमान वाटेल, अशी निर्मिती धरमतर येथील मरिन फ्रंटीयर्स या अल्युमिनियम बोट बिल्डिंग कंपनीने केली आहे. नेदरलँड नौदलासाठी तब्बल ३६ मीटर लांबीची गस्ती नौका मरिन फ्रंटीयर्सने तयार केली आहे. भारतीय कंपनीने दुसऱ्या देशासाठी अशी नौका बनविण्याची ही पहिलीच वेळ आहे. (प्रतिनिधी)भविष्यात रोजगार वाढीसाठी मदत होईल - मुख्यमंत्री बोटीचे उद्घाटन केल्यानंतर गौरव करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जगभरात अ‍ॅल्युमिनियमच्या व्यावसायिक बोटी निर्यात करणारी मरिन फ्रंटीयर्स ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य कंपनी आहे. आपण जे मेक इन इंडिया म्हणतो, मेक इन महाराष्ट्र म्हणतो त्याची खरी सुरु वात रायगड अलिबाग येथे आ. भाई जयंत पाटील यांनी करून दाखविली आहे. अनेक देश या प्रकारच्या बोटी बनवण्याच्या प्रयत्नात होते. पण या प्रकारची अद्ययावत वैशिट्यपूर्ण बोट मरिन फ्रंटीयर्स यांच्या टीमने करून दाखविली आहे. भविष्यकाळात अशा प्रकारच्या बोटींचे उत्पादन करून रायगड तसेच महाराष्ट्रात आ. पाटील यांच्यामुळे रोजगारवाढीसाठी नक्कीच मदत होईल, असा विश्वास त्यांनी अखेरीस व्यक्त केला.१५० टन क्षमतेची देशातील एकमेव मरिन ट्रॅव्हल्स लिफ्ट वर्षाला सुमारे २०० बोटी बनविण्याची क्षमता असलेला कारखाना आणि ७५००० चौ. मीटरचा वॉटर फ्रंट हे मरिन फ्रंटीयर्सचे वैशिष्ट्य आहे. भारतीय सागरी उद्योग जगतात मुख्यत्वेकरून भारतीय तटरक्षक दल व नौसेनेच्या बोटींच्या देखभाल व दुरुस्तीसाठी कंपनी वर्षभर कधीही उपलब्ध आहे. मरिन फ्रंटीयरकडे असलेली १५० टन क्षमतेची मरिन ट्रॅव्हल्स लिफ्ट ही देशातील एकमेव असून त्यायोगे देखभाल व दुरु स्तीची कामे करणे शक्य आहे. सन २०१७ अखेरपर्यंत नवीन यंत्रसामग्रीमध्ये गुंतवणूक करून कंपनीने आपली क्षमता ५०० टनांपर्यंत करण्याचे नियोजन केले असल्याचे या वेळी सांगण्यात आले. स्थानिक मनुष्यबळाचा वापर करून निर्यातक्षम बोटनिर्मिती - नृपाल पाटीलमरिन फ्रंटीयर्स कंपनीचे संचालक नृपाल पाटील म्हणाले, मरिन फ्रंटीयर्स कंपनीने आपली उत्पादने व सेवांसाठी दीर्घकाळ मदतीची हमी देत असतानाच संपूर्णपणे स्थानिक मनुष्यबळाचा वापर करून त्यांना कंपनीअंतर्गत प्रशिक्षण देऊन पुढे अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये झपाट्याने गुंतवणूक करून स्थानिकांना तांत्रिक क्षेत्रातील नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांनी पुरेपूर मेहनत घेऊन मी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखविला याबद्दल संपूर्ण टीमचा मला अभिमान आहे. बोटी तयार करण्यासाठी लागणारे मटेरीअल ही ९० टक्के भारतीय आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात व्यावसायिक बोटी बनवण्यासाठी अलिबाग जगाच्या नकाशावर पोहोचले आहे. मी अलिबागकर असल्याचा मला अभिमान आहे व रायगडमध्ये नवीन रोजगार निर्मितीसाठी मी प्रयत्नशील असल्याचे नृपाल पाटील यांनी अखेरीस सांगितले.