मराठी नववर्षाला सुरुवात, यंदाचे वर्ष १३ महिन्यांचे असणार; गणेशोत्सव, दिवाळी १९ दिवस उशिरा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 11:05 AM2023-03-28T11:05:14+5:302023-03-28T11:05:25+5:30

१२ महिन्यांचे एक वर्ष असते; पण यंदाचे वर्ष १३ महिन्यांचे असणार आहे.

Beginning of Marathi New Year, this year will be 13 months long; Ganeshotsav, Diwali 19 days late | मराठी नववर्षाला सुरुवात, यंदाचे वर्ष १३ महिन्यांचे असणार; गणेशोत्सव, दिवाळी १९ दिवस उशिरा

मराठी नववर्षाला सुरुवात, यंदाचे वर्ष १३ महिन्यांचे असणार; गणेशोत्सव, दिवाळी १९ दिवस उशिरा

googlenewsNext

गुढी पाडव्यापासून मराठीनववर्षाला सुरुवात झाली. १२ महिन्यांचे एक वर्ष असते; पण यंदाचे वर्ष १३ महिन्यांचे असणार आहे. म्हणजे एक जास्तीचा महिना आला आहे. त्याला अधिक ‘मास’ असे म्हणतात. यामुळे १८ जुलैच्या आधी जे सण येणार ते मागील वर्षीच्या तुलनेत १९ ते २० दिवस अगोदर व जुलैनंतर जे नागपंचमी, श्रीकृष्ण जयंती, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हे सण १९ ते २० दिवस उशिराने येणार आहेत. 

दिवाळी, दसरा १९ दिवस उशिरा

श्रावणापासून विविध सण-उत्सवांना सुरुवात होते. यंदा अधिक मास असल्याने नागपंचमीपासून ते दिवाळीपर्यंतचे सर्व सण गेल्यावर्षाच्या तुलनेत १९ ते २० दिवस उशिरा येणार आहेत.

अधिक मासमुळे वाढला महिना

कालगणनेच्या दोन पद्धती आहेत. सौरवर्ष आणि चंद्रवर्ष. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. सूर्याभोवती एक फेरी मारण्यासाठी पृथ्वीला ३६५ दिवस लागतात. याला आपण सौरवर्ष म्हणतो. तर चंद्र पृथ्वीभोवती एक फेरी २८ दिवसांत पूर्ण करतो. त्यानुसार सौरवर्षाप्रमाणे चांद्रवर्षाचे १२ महिन्यांचे ३६५ दिवस न भरता ३५४ दिवस भरतात. दोन्हीतील ताळमेळ घालण्यासाठी दर तीन वर्षांनी चंद्रमास दोनदा मोजतात आणि त्यालाच ‘अधिक मास’ म्हणतात. चंद्रवर्ष १३ महिन्यांचे असते.

१८ जुलैपासून अधिक मास 

२०२३ या वर्षात अधिक मास आला आहे. यंदा १८ जुलैला अधिक मास सुरू होणार आहे, तर १६ ऑगस्ट २०२३ ला संपेल. श्रावण महिन्यात अधिक मास येत असल्याने यंदा श्रावण चार महिन्यांऐवजी ५ महिन्यांचा असणार आहे. २०२३ नंतर पुढील अधिक मास १७ मे ते १५ जून २०२६ या वर्षात येणार आहे. म्हणजे १३ महिन्यांचे वर्ष यापुढे २०२६ हे असणार आहे.

नागपंचमी २१ ऑगस्ट
राखीपौर्णिमा ३० ऑगस्ट 
गणेशोत्सव १९ ऑगस्ट 
महालक्ष्मी सण २१ ते २३ ऑगस्ट 
अनंत चतुर्दशी २८ ऑगस्ट 
घटस्थापना १५ ऑक्टोबर 
दसरा २४ ऑक्टोबर
लक्ष्मीपूजन (दिवाळी) १२ नोव्हेंबर
पाडवा १४ नोव्हेंबर
भाऊबीज १५ नोव्हेंबर

Web Title: Beginning of Marathi New Year, this year will be 13 months long; Ganeshotsav, Diwali 19 days late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.