गुढी पाडव्यापासून मराठीनववर्षाला सुरुवात झाली. १२ महिन्यांचे एक वर्ष असते; पण यंदाचे वर्ष १३ महिन्यांचे असणार आहे. म्हणजे एक जास्तीचा महिना आला आहे. त्याला अधिक ‘मास’ असे म्हणतात. यामुळे १८ जुलैच्या आधी जे सण येणार ते मागील वर्षीच्या तुलनेत १९ ते २० दिवस अगोदर व जुलैनंतर जे नागपंचमी, श्रीकृष्ण जयंती, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हे सण १९ ते २० दिवस उशिराने येणार आहेत.
दिवाळी, दसरा १९ दिवस उशिरा
श्रावणापासून विविध सण-उत्सवांना सुरुवात होते. यंदा अधिक मास असल्याने नागपंचमीपासून ते दिवाळीपर्यंतचे सर्व सण गेल्यावर्षाच्या तुलनेत १९ ते २० दिवस उशिरा येणार आहेत.
अधिक मासमुळे वाढला महिना
कालगणनेच्या दोन पद्धती आहेत. सौरवर्ष आणि चंद्रवर्ष. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. सूर्याभोवती एक फेरी मारण्यासाठी पृथ्वीला ३६५ दिवस लागतात. याला आपण सौरवर्ष म्हणतो. तर चंद्र पृथ्वीभोवती एक फेरी २८ दिवसांत पूर्ण करतो. त्यानुसार सौरवर्षाप्रमाणे चांद्रवर्षाचे १२ महिन्यांचे ३६५ दिवस न भरता ३५४ दिवस भरतात. दोन्हीतील ताळमेळ घालण्यासाठी दर तीन वर्षांनी चंद्रमास दोनदा मोजतात आणि त्यालाच ‘अधिक मास’ म्हणतात. चंद्रवर्ष १३ महिन्यांचे असते.
१८ जुलैपासून अधिक मास
२०२३ या वर्षात अधिक मास आला आहे. यंदा १८ जुलैला अधिक मास सुरू होणार आहे, तर १६ ऑगस्ट २०२३ ला संपेल. श्रावण महिन्यात अधिक मास येत असल्याने यंदा श्रावण चार महिन्यांऐवजी ५ महिन्यांचा असणार आहे. २०२३ नंतर पुढील अधिक मास १७ मे ते १५ जून २०२६ या वर्षात येणार आहे. म्हणजे १३ महिन्यांचे वर्ष यापुढे २०२६ हे असणार आहे.
नागपंचमी २१ ऑगस्टराखीपौर्णिमा ३० ऑगस्ट गणेशोत्सव १९ ऑगस्ट महालक्ष्मी सण २१ ते २३ ऑगस्ट अनंत चतुर्दशी २८ ऑगस्ट घटस्थापना १५ ऑक्टोबर दसरा २४ ऑक्टोबरलक्ष्मीपूजन (दिवाळी) १२ नोव्हेंबरपाडवा १४ नोव्हेंबरभाऊबीज १५ नोव्हेंबर