गाळ काढण्यास अखेर सुरुवात

By admin | Published: May 25, 2017 12:43 AM2017-05-25T00:43:35+5:302017-05-25T00:43:35+5:30

वडाळ्यातील कोरबा मिठागरमधील नालेसफाई संथ गतीने होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते

The beginning of the removal of the mud begins | गाळ काढण्यास अखेर सुरुवात

गाळ काढण्यास अखेर सुरुवात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वडाळ्यातील कोरबा मिठागरमधील नालेसफाई संथ गतीने होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या वेळी ‘लोकमत’ने कोरबा मिठागर परिसरातील नागरिकांच्याही समस्या प्रकर्षाने मांडल्या. या वृत्ताची दखल घेत पालिकेने अखेर नालेसफाई सुरू केली आहे.
विभागातील नागरिकांनी सांगितले, गेले दोन दिवस जेसीबीसह इतर यंत्रसामग्रीचा वापर करून नालेसफाई करण्यात आली. संपूर्ण नाला जेसीबीच्या साहाय्याने साफ करता येत नसल्याने पालिकेचे कर्मचारी नाल्यात उतरून
नालेसफाई करीत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. नाल्यातील गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यात आला आहे.
नाल्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण झाल्याने नाला अरुंद झाला आहे. त्यामुळे येथे मोठी यंत्रसामग्री वापरून नालेसफाई करण्यात अडचणी येत आहेत. परंतु ज्या संस्थेकडे या विभागातील नालेसफाईचे काम सोपविण्यात आले आहे ते कर्मचारी स्वत: नाल्यात उतरून सफाई करीत आहेत.
येत्या आठ दिवसांत नालेसफाई पूर्ण होईल, अशी माहिती काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका पुष्पा कोळी यांनी दिली.

Web Title: The beginning of the removal of the mud begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.