मान्सूनच्या परतीला सुरुवात; मुंबईतही लवकरच सॅन्डॉप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 12:31 PM2020-09-29T12:31:06+5:302020-09-29T12:33:01+5:30

महाराष्ट्रात १७ टक्के अधिकच्या पावसाची नोंद

The beginning of the return of the monsoon; Sandop soon in Mumbai too | मान्सूनच्या परतीला सुरुवात; मुंबईतही लवकरच सॅन्डॉप

मान्सूनच्या परतीला सुरुवात; मुंबईतही लवकरच सॅन्डॉप

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्रात १७ टक्के अधिक पाऊस मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस

मुंबई : राजस्थानच्या पश्चिम भागातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरु केला असतानाच्या काळात महाराष्ट्रात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत १७ टक्के अधिकच्या पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात चार महिन्यात मान्सूनची ९९५.३ मिमी नोंद होते. यावर्षी १ हजार १६३.५ मिमी पाऊस कोसळला असून, अधिकच्या पावसाने महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता उर्वरित राज्यात मान्सूनने ब-यापैकी सरासरी ओलांडली आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबरच्या आसपास मान्सून राजस्थानतून आपला परतीचा प्रवास सुरु करतो. मात्र यावर्षी तब्बल ११ दिवस विलंबाने मान्सूनने आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. येत्या ४८ तासांत मान्सून हरियाणा, चंदिगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमधून परतीचा प्रवास सुरु करेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. यानंतर मान्सूनच्या परतीचा प्रवास महाराष्ट्रातून सुरु होण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक  राहणार आहे. मुंबईत देखील मान्सूनला गुड बाय करण्याची वेळ आली असून, आता परतीच्या पावसाचे वातावरण येथे तयार होईल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. 
--------------------

विभागावर अधिक पाऊस टक्क्यांत
कोकण गोवा २८
मध्य महाराष्ट्र ३०
मराठवाडा ३१
विदर्भ १० टक्के तूट
-------------------

जिल्हानिहाय अधिक पाऊस टक्क्यांत
मुंबई शहर २३
मुंबई उपनगर ९३
ठाणे २४
रायगड ११
रत्नागिरी ११
सिंधुदुर्ग १४५
कोल्हापूर ४७
सांगली ६०
सातारा ३०
पुणे ४७
नाशिक ३०
नंदुरबार १६
धुळे ५५
औरंगाबाद ३८
अहमदनगर १०२
उस्मानाबाद ५०
लातूर ८३
बीड ५१
परभणी ७६
जालना ४७
जळगाव २९
बुलडाणा १४
वाशिम ४१
हिंगोली ३५
नांदेड ४५
-------------------

तूट : जिल्हानिहाय पाऊस टक्क्यांत
सोलापूर ५
अकोला २५
अमरावती १५
यवतमाळ ४
वर्धा ५
नागपूर २५
चंद्रपूर ४७
भंडारा ७०
गोंदिया ५९
गडचिरोली २१
पालघर ३०
-------------------

मान्सूनच्या परतीच्या तारखा (ऑक्टोबर)
जळगाव ६
नागपूर ६
मुंबई ८
अहमदनगर ८
सातारा ९
कोल्हापूर ११
पुणे ११

 

Web Title: The beginning of the return of the monsoon; Sandop soon in Mumbai too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.