महापालिकेच्या वतीने बीसीजी लसच्या ट्रायलला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 02:30 AM2020-08-21T02:30:05+5:302020-08-21T02:30:26+5:30
पालिका प्रशासनाच्या वतीने मुंबईत एफ दक्षिण व जी दक्षिण विभागातील २५० ज्येष्ठ नागरिकांना बीसीजी लस देण्यात येणार आहे.
मुंबई : जगभरात कोविडच्या आजाराने ज्येष्ठ नागरिकांना ग्रासले आहे. शिवाय, अतिजोखमीचे आजार असल्यामुळे मृत्युदरही तरुणांच्या तुलनेत पुष्कळ असतो. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, बीसीजी लस सामान्यत: लहान बालकांचे क्षयरोगापासून रक्षण करते.
हीच लस अनेक श्वसनविकारांपासूनही रक्षण करते. विषाणूविरुद्धही ती प्रभावी असल्याचे आढळते, त्यामुळे ती सहज देण्यायोगी असून किफायतशीर आहे. पालिका प्रशासनाच्या वतीने मुंबईत एफ दक्षिण व जी दक्षिण विभागातील २५० ज्येष्ठ नागरिकांना बीसीजी लस देण्यात येणार आहे.
या अभ्यासात ६० ते ७५ वयोगटातील कोविड न झालेल्या एचआयव्ही किंवा कर्करोग असे आजार नसलेल्या व्यक्तींची संमती असेल तर बीसीजी लस देण्यात येणार आहे. पुढील सहा महिने त्याचा परिपूर्ण अभ्यास केला जाईल. तसेच, सर्व चाचण्या केल्यानंतरच ही लस देण्यात येणार आहे. मुंबईतील एफ दक्षिण व जी दक्षिण विभागातील या ट्रायलमध्ये सहभागी होण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. कोविडच्या महामारीत वृद्ध व्यक्तींसाठी बीसीजी लस
उपयुक्त ठरते का, याविषयी आयसीएमआर संस्थेने संशोधन हाती घेतले आहे.
बीसीजी दिल्यामुळे कोविडची शक्यता, गांभीर्य व मृत्युदर कमी करता येईल का याचा चेन्नई, मुंबई, अहमदनगर, भोपाळ, जोधपूर व नवी दिल्ली या शहरांमध्ये अभ्यास केला जाणार आहे. त्याचप्रमाणे केईएम रुग्णालय व पालिकेच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे संशोधन मुंबईत होण्यासाठी नुकतीच मंजुरी प्राप्त झाली आहे.
या अभ्यासात ६० ते ७५ वयोगटातील कोविड न झालेल्या एचआयव्ही किंवा कर्करोग असे आजार नसलेल्या व्यक्तींची संमती असेल तर बीसीजी लस दिली जाई़ल. सहा महिने त्याचा अभ्यास केला जाईल.