बेरोजगार तरुणांचे मानखुर्दमध्ये ‘भीक मांगो’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 02:49 AM2019-09-23T02:49:38+5:302019-09-23T02:49:41+5:30
हातात सरकारच्या निषेधाचे फलक, सरकार विरोधी घोषणाबाजी व भीक गोळा करत आंदोलन
मुंबई : उच्चशिक्षण घेऊनदेखील नोकरी मिळत नसल्यामुळे भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने लल्लूभाई कंपाउंड, मानखुर्द येथे सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी भीक मांगो आंदोलन केले. हातात सरकारच्या निषेधाचे फलक, सरकार विरोधी घोषणाबाजी व भीक गोळा करत हे आंदोलन करण्यात आले.
राज्यातील बेरोजगारांना दरमहा ८ हजार महागाई भत्ता द्यावा, ३६ हजार शिक्षक भरती तत्काळ करावी, पॅरमेडिकलच्या जाहिराती काढून त्यांचा अनुशेष भरावा, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्यसेवक भरती व तत्सम अनुशेष तत्काळ भरावा, मोटर परिवहन विभाग परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्ती देण्यात यावी, एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्ती देण्यात यावी, महापरीक्षा पोर्टलवर बंदी घालावी, या मागण्या करण्यात आल्या.