‘त्या’ महिला एसटी कर्मचाºयाचे निलंबन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 07:17 AM2018-03-06T07:17:01+5:302018-03-06T07:17:01+5:30
मुंबई सेंट्रल आगारात व्हिडीओ रेकॉर्डिंग करत असल्याच्या संशयावरून निलंबित करण्यात आलेल्या महिला कर्मचाºयाचे निलंबन अखेर मागे घेण्यात आले आहे. एसटी महामंडळात ‘व्हिडीओ काढल्याच्या संशयावरून थेट निलंबन’ असे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रदर्शित होताच महामंडळाला जाग आली.
मुंबई : मुंबई सेंट्रल आगारात व्हिडीओ रेकॉर्डिंग करत असल्याच्या संशयावरून निलंबित करण्यात आलेल्या महिला कर्मचाºयाचे निलंबन अखेर मागे घेण्यात आले आहे. एसटी महामंडळात ‘व्हिडीओ काढल्याच्या संशयावरून थेट निलंबन’ असे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रदर्शित होताच महामंडळाला जाग आली. या प्रकरणातील संबंधितांना बोलावून निलंबन हे अयोग्य असल्याचे ठरवत निलंबन मागे घेण्यात आले. मात्र नियमबाह्य बदली अद्याप कायम आहे.
नियमानुसार नियोजित ड्युटी लावावी, या मागणीसाठी महिला वाहक मुंबई सेंट्रल आगारातील वरिष्ठ आगार व्यवस्थापक यांच्याकडे गेली होती. या वेळी महिला वाहकाच्या हातात मोबाइल होता. नियोजित ड्युटी लावावी, यासाठी झालेल्या चर्चेत आगार व्यवस्थापकांनी महिलेने मोबाइलद्वारे व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याच्या संशयावरून तिचा मोबाइल काढून घेण्यात आला होता. त्यानंतर तिचे निलंबन करण्यात आले होते.
मात्र, व्हिडीओ रेकॉर्डिंग उपलब्ध नसल्यामुळे केवळ संशयावरून करण्यात आलेले निलंबन अयोग्य ठरवत मागे घेण्यात आले. वरिष्ठ अधिकाºयांच्या माहितीनुसार, बदली ही नियमबाह्य असून ती रद्द करण्याचे तोंडी आदेश देण्यात आलेले आहेत. याबाबत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल आणि महाव्यवस्थापक माधव काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.