ठाकरेंशी फारकत घेणं आयुष्यातील दु:खाचा क्षण; शिंदे गटातील 'या' मंत्र्याच वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 05:18 PM2023-01-02T17:18:35+5:302023-01-02T17:19:09+5:30

गेल्या सहा महिन्यापूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेतून ४० आमदारांनी बंड करत भाजपसोबत युती करुन सरकार स्थापन केले.

Being away from Uddhav Thackeray is the saddest moment of my life says minister gulabrao patil | ठाकरेंशी फारकत घेणं आयुष्यातील दु:खाचा क्षण; शिंदे गटातील 'या' मंत्र्याच वक्तव्य

ठाकरेंशी फारकत घेणं आयुष्यातील दु:खाचा क्षण; शिंदे गटातील 'या' मंत्र्याच वक्तव्य

googlenewsNext

गेल्या सहा महिन्यापूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेतून ४० आमदारांनी बंड करत भाजपसोबत युती करुन सरकार स्थापन केले. यानंतर दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काल मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेना पुन्हा एकसंघ व्हायला वेळ लागणार नाही, असं वक्तव्य केले होते. यानंतर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनीही उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात एक  भावनिक वक्तव्य केले आहे. 

मी मंत्रिमंडळात काम सुरू केल्यापासून सर्व गावांसाठी आम्ही पाण्यासाठी काम सुरू केले. सर्व नागरिक खूष होते, लोकांनी आम्हाला चांगला रिसपॉन्स दिला. पण, ज्यावेळी शिवसेनेत हा प्रकार घडला. उद्धव ठाकरेंनी आमच ऐकलं नाही. त्यामुळे आम्हाला हा मार्ग स्विकारावा लागला, तो माझ्या आयुष्यातील दु:खाचा क्षण आहे, असं वक्तव्य आज शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. 

शिवसेना एकसंघ होणार? दीपक केसरकरांची आपल्या वक्तव्यावर भावनिक रिएक्शन

'शिवसेना एकसंघ व्हायला वेळ लागणार नाही'

नववर्षानिमित्ताने शनि शिंगणापूर, शिर्डी येथे लाखो भाविकांनी दर्शन घेत नववर्षाचा श्रीगणेशा केला. शिंगणापूर येथे शनि देवाच्या शिळेवरती तेलाचा अभिषेक करण्यात आला. तर शिर्डीत साई चरणी लीन होत साई नामाचा गजर केला. नव वर्षानिमित्त साई मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. आज वर्षारंभी साईमूर्तीवर सुवर्णालंकार घालण्यात आले होते. रविवारी मध्यरात्री बाराच्या ठोक्याला साई नामाचा व भजनाचा गजर करण्यात आला. राजकीय नेते आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही मध्यरात्रीच दर्शन घेतले. यावेळी, पत्रकारांशी बोलताना शिवसेनेचे प्रवक्ते आणि मंत्री दिपक केसरकर यांनी शिवसेना एकीचे संकेत दिले आहेत. 

दीपक केसरकरांची आपल्या वक्तव्यावर भावनिक रिएक्शन

'पैशाने जर राज्य बदलत असेल तर उद्योजकांनीच राज्य केले असते. काही कारण असतात त्यामुळे लोक दुख:वतात. राजकारणा पलिकडे जाऊन मैत्री असते. आपल्या आजुबाजूची लोक असतात, ती चुकीची माहिती देत असतात. मी बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराबरोबर गेलो. मला पर्रिकर साहेब पंतप्रधानाच्याकडे भेटायला जात होते.

'पैशाने जर राज्य बदलत असेल तर उद्योजकांनीच राज्य केले असते. काही कारण असतात त्यामुळे लोक दुख:वतात. राजकारणा पलिकडे जाऊन मैत्री असते. आपल्या आजुबाजूची लोक असतात, ती चुकीची माहिती देत असतात. मी बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराबरोबर गेलो. मला पर्रिकर साहेब पंतप्रधानाच्याकडे भेटायला जात होते.

Web Title: Being away from Uddhav Thackeray is the saddest moment of my life says minister gulabrao patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.