Mumbai Train Update: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर लोकलला अपघात; ट्रेन बफरला धडकली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 01:21 PM2019-04-26T13:21:35+5:302019-04-26T13:39:46+5:30

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात शुक्रवारी (26 एप्रिल) लोकलला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. हार्बर लाईनवरील एक लोकल ट्रेन बफरला धडकली आहे.

Belapur-CSMT Harbour line train hits buffer crossing | Mumbai Train Update: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर लोकलला अपघात; ट्रेन बफरला धडकली

Mumbai Train Update: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर लोकलला अपघात; ट्रेन बफरला धडकली

Next
ठळक मुद्देमुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात शुक्रवारी (26 एप्रिल) लोकलला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.हार्बर लाईनवरील एक लोकल ट्रेन बफरला धडकली आहे. फलाट क्रमांक एकवर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई - मुंबईतीलछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात शुक्रवारी (26 एप्रिल) लोकलला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. हार्बर लाईनवरील एक लोकल ट्रेन बफरला धडकली आहे. फलाट क्रमांक एकवर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. लोकल ट्रेन बफरला धडकल्याने जोराचा आवाज झाला. दरम्यान, या अपघातात सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही. मात्र फलाट क्रमांक एकवरील वाहतून काही काळ खोळंबली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकलचा वेग कमी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, मोटरमनने तातडीने ब्रेक दाबल्याने बसलेल्या झटक्यामुळे लोकलच्या डब्यांना हादरा बसला. मात्र सुदैवाने कोणतीही हानी झाली नसून सर्व प्रवासी हे सुखरूप आहेत. हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक ही या घटनेनंतर काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र लोकल तातडीने मागे घेत मार्ग मोकळा करण्यात आला. त्या नंतर काही काळ बंद पडलेली हार्बर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. 



छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर याआधी डिसेंबर 2015 मध्ये   बफरला धडकून लोकलचे दोन डबे रुळावरून घसरल्याची दुर्घटना घडली होती. मध्यरात्री दोनच्या सुमारास लोकल शटिंगच्यावेळीस हा अपघात घडला होता. सुदैवाने त्यात कोणीही जखमी झाले नवहते. तसेच रात्रीची वेळ असल्यामुळे स्थानकावर गर्दी नसल्याने मोठी दुर्घटना टळली होती. मात्र या अपघातात लोकल व प्लॅटफॉर्मचं मोठं नुकसान झालं होतं. तसेच चर्चगेट स्थानकावर लोकल बफरला धडकून झालेल्या  अपघातात मोटरमनसह पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले होते.

या घटनेनंतर रेल्वेकडून चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक चौकशी समिती स्थापन केली आहे. तसेच गार्डलाही निलंबित करण्यात आले होते. मोटरमननेही कामात हलगर्जीपणा दाखविल्यामुळे त्याचीही चौकशी केली जाणार असल्याचे रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले होते. या घटनेत गार्डही जखमी झाले आहेत. गार्डकडून ब्रेकही लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो लागला नाही. तसेच ही ट्रेन जवळपास ताशी 10 ते 15 किमी एवढी वेगाने होती, असे सांगण्यात आले होते.

 

Web Title: Belapur-CSMT Harbour line train hits buffer crossing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.