Join us

मुंबईतील संवेदनशील ठिकाणांवर बेल्जियन शेफर्डचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 5:05 AM

लॅबरेडोर, डॉबरमन पाठोपाठ बेल्जियन शेफर्ड हे श्वान मुंबई पोलीस दलात पहिल्यांदाच दाखल झाले आहेत.

मुंबई : लॅबरेडोर, डॉबरमन पाठोपाठ बेल्जियन शेफर्ड हे श्वान मुंबई पोलीस दलात पहिल्यांदाच दाखल झाले आहेत. चपळ, काटक तितकाच अटॅकर भूमिकेत असणाऱ्या बेल्जियन शेफर्डकडे मुंबईतील संवेदनशील ठिकाणांची जबाबदारी असेल. येत्या काळात मुंबई पोलीस दलात बेल्जियम शेफर्डलाच प्राधान्य देणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले. या प्रजातीचे १० श्वान दाखल होतील.मुंबईतील विविध गुन्ह्यांचा शोध घेण्याबरोबरच येथील संवेदनशील ठिकाणांची जबाबदारी मुंबई पोलिसांवर असते. अशा परिस्थितीत भारतीय लष्कर, एनएसजीप्रमाणे मुंबईतही पहिल्यांदाच बेल्जियम शेफर्डला पोलीस दलात दाखल करुन घेतले आहेत. एक वेळ उपकरणाचा अंदाज चुकू शकतो. मात्र, श्वानाचा अंदाज चुकत नाही. बेल्जियम शेफर्ड हे श्वान अत्यंत हुशार आहे. कुठल्याही हवामानात तो सहज रुळतो. लॅबरेडॉर, डॉबरमनच्या तुलनेत तो अधिक पटीने पुढे आहे. तो थकत नाही. नेहमीच नव्या कामगिरीसाठी सज्ज असतो.मुंबई पोलीस दलातील गोरेगाव श्वान पथकाकडे १२, बॉम्बशोधक व नाशक पथक (बीडीडीएस) ९ आणि आणि गुन्हे शाखेकडे ९ असे एकूण २५ श्वान मुंबई पोलिसांकडे आहेत. यात आता बेल्जियन शेफर्डचा समावेश होईल. या एका श्वानाची किंमत ८० हजार रुपये आहे. अन्य श्वानाच्या तुलनेत त्याच्या आहाराचा दर्जाहीउच्च आहे.मुंबई पोलीस दलात दाखल होणाºया दहा श्वानांपैकी ५ श्वानांना लवकरच ९ महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे प्रशिक्षक जे.बी. गायकवाड यांनी दिली. या श्वानांबरोबरच देशात पहिल्यांदाच महिला हँडलर्सलाही पुणे, हरियाणा किंवा राजस्थान यापैकी एका प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहेत.>काटक, चपळ, अटॅकर...बेल्जियन शेफर्ड चपळ, काटक असून अटॅकर आहे. सर्व परिस्थितींना सहजपणे तोंड देण्याची क्षमता त्याच्यात असल्याचे गुन्हे शाखेचे प्रशिक्षक जे.बी. गायकवाड यांनी सांगितले. मुंबईतील स्फोटके, अमली पदार्थांसह संशयित आरोपींचा शोधासाठी लॅबरेडोर आणि डॉबरमन कार्यरत होते. आता संवेदनशील ठिकाणांची जबाबदारी बेल्जियन शेफर्डकडे असेल.

टॅग्स :प्रजासत्ताक दिन