इमानचे वजन ५०० किलोवरून ३७८ किलोवर

By admin | Published: March 11, 2017 01:37 AM2017-03-11T01:37:33+5:302017-03-11T01:37:33+5:30

चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात दाखल झालेल्या इजिप्तच्या ३६ वर्षीय इमान अहमदचे वजन ५०० किलोहून आता ३७८ किलोवर आले आहे. यानंतर आणखी काही दिवसांनंतर

Belief of weight ranges from 500 kg to 378 kg | इमानचे वजन ५०० किलोवरून ३७८ किलोवर

इमानचे वजन ५०० किलोवरून ३७८ किलोवर

Next

चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात दाखल झालेल्या इजिप्तच्या ३६ वर्षीय इमान अहमदचे वजन ५०० किलोहून आता ३७८ किलोवर आले आहे. यानंतर आणखी काही दिवसांनंतर इमानचे पहिल्या टप्प्यातील उपचार पूर्ण झाल्यानंतर इमान इजिप्तला रवाना होणार आहे. इजिप्तला गेल्यानंतरही तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणार असल्याची माहिती डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी दिली.

जगातील सर्वांत वजनदार महिला अशी ओळख असलेल्या इजिप्तच्या इमान अहमदवर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. सैफी रुग्णालयात ७ मार्च रोजी इमानवर वजन कमी करण्यासाठी बेरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेपूर्वी आहार आणि औषधोपचारामुळे अवघ्या महिनाभरातच तिचे १२० किलो वजन घटले होते. त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

सध्या दिवसातून दोन-दोन तासांनी इमान खाते. त्यात हायप्रोटिन्स लिक्विड्सचा आहार सुरू आहे, यात १७५० कॅलरीज् असून २०० ग्रॅम्स प्रोटिन्स आहेत. इजिप्तला घरी गेल्यानंतर इमानला केवळ चिकन सँडविच आणि कस्टर्ड खाण्याची परवानगी आहे.

Web Title: Belief of weight ranges from 500 kg to 378 kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.