मिठी नदीच्या खाली आता मेट्रोचे भुयार...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 04:16 AM2019-02-07T04:16:26+5:302019-02-07T04:17:03+5:30
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे हाती घेण्यात आलेल्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ चे भूगर्भात सुरु असलेले काम मुंबईकरांसाठी दिवसागणिक कुतूहलाचा विषय ठरत आहे.
मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे हाती घेण्यात आलेल्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ चे भूगर्भात सुरु असलेले काम मुंबईकरांसाठी दिवसागणिक कुतूहलाचा विषय ठरत आहे. या कामा अंतर्गत पॅकेज-५ मध्ये मोडणारे मिठीखालील भुयारीकरण बुधवारी सुरु झाले आहे. १५३ मीटरर्स भुयार तयार केले जाणार आहे. न्यू आॅस्ट्रियन टनेलिंग पद्धतीने हे भुयारीकरण होईल. काही भाग नदीच्या पात्रात (खारफुटीमध्ये) तर काही भाग पाण्याखाली असेल. हे भुयार आॅक्टोबर २०१९ मध्ये पुर्ण होईल, असा विश्वास कॉर्पोरेशनने व्यक्त केला आहे. देशातील हा दुसरा मेट्रो प्रकल्प असून, ज्यात नदीच्या खालून भुयारीकरण होणार आहे. कोलकाता येथे भुयारी मेट्रो प्रकल्पामध्ये हुगळी नदी खालून झालेले भुयारीकरण हे देशातील नदीपात्रा खालील पहिले भुयार आहे़