बेस्टच्या ६४६ बस सेवेचे नागरी निवारा पर्यंत होणार विस्तारीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 08:00 PM2018-05-03T20:00:05+5:302018-05-03T20:00:05+5:30
गोरेगाव(पूर्व)रेल्वे स्थानक ते दिंडोशी बस स्थानकांपर्यंत पांडुरंग वाडी मार्गे धावणारी बस क्रमांक ६४६ही बस आता गोरेगाव (पूर्व)नागरी निवारा १ व २ पर्यंत विस्तारित करण्यात आली असून या नव्या बससेवेचा उद्या दि,4 मे रोजी सकाळी 9 वाजता शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद व आमदार सुनील प्रभू याच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे.
मुंबई - गोरेगाव(पूर्व)रेल्वे स्थानक ते दिंडोशी बस स्थानकांपर्यंत पांडुरंग वाडी मार्गे धावणारी बस क्रमांक ६४६ही बस आता गोरेगाव (पूर्व)नागरी निवारा १ व २ पर्यंत विस्तारित करण्यात आली असून या नव्या बससेवेचा उद्या दि,4 मे रोजी सकाळी 9 वाजता शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद व आमदार सुनील प्रभू याच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे.
लोकमतने या बस विस्तारीकरणाची येथील पालक नंदिनी परब व अन्य पालक व विद्यार्थ्यांची मागणी सातत्याने मांडली होती.आमदार प्रभू यांनी लोकमतच्या बातम्यांची दखल घेत हा विषय बेस्टच्या महाव्यवस्थापक व बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष अनिल कोकीळ यांच्याकडे मांडला होता.अखेर लोकमत व शिवसेनेमुळे येथील हजारो नागरिकांना या बस सेवेचा लाभ होणार असल्याची प्रतिक्रिया येथील नागरिकांनी व पालकांनी व्यक्त केली.
स्व.मीनाताई ठाकरे उद्यान येथे होणाऱ्या बससेवेच्या शुभारंभप्रसंगी स्थानिक प्रभाग क्रमांक 40 चे शिवसेना नगरसेवक अँड.सुहास वाडकर,प्रभाग क्रमांक 41 चे नगरसेवक तुळशिराम शिंदे,माजी नगरसेवक चंद्रकांत वाडकर व सदाशिव पाटील,शाखाप्रमुख संदीप जाधव व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे खासदार व शिवसेना नेते गजानन कीर्तिकर व आमदार प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक अँड.सुहास वाडकर यांनी बेस्टचे माजी अध्यक्ष अनिल कोकीळ व विद्यमान अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
सदर बससेवा गोरेगांव(पूर्व)रेल्वे स्थानक,पांडुरंग वाडी,दिंडोशी बस स्थानकवरून पुढे गोकुळधाम मार्केट,वाघेश्वरी,सामना परिवार,संकल्प,आयटी पार्क मेन गेट,मैत्रीय सोसायटी तसेच नागरी निवारा १ व २ अशी धावणार आहे.सकाळी पहिली बस गोरेगावरून सकाळी 6.30 वाजता व नागरी निवारा 1 व 2 वरून सकाळी 6.55 मिनीटांनी तसेच रात्री शेवटची बस गोरेगाव स्थानकावरून 9.30 वाजता व नागरी निवारा 1 व 2 वरून रात्री 9.55 ला गोरेगाव स्थानकाकडे रवाना होईल अशी माहिती नगरसेवक अँड.वाडकर यांनी दिली.
या बस सेवेच्या विस्तारीकरणामुळे नागरी निवारा वसाहत १-२ व ५-६,तसेच न्यू म्हाडा वसाहत,सामना परिवार,संकल्प तसेच इन्फिनिटी आयटी पार्क येथे अनेक कंपन्यातील कर्मचारीवर्ग अश्या हजारो नागरिकांना या बससेवेचा फायदा होणार आहे.तसेच गोरेगांव(पूर्व)रेल्वे स्थानकाजवळील सन्मित्र आणि सेंट थाँमस येथील शाळेत जाणाऱ्या येथील शेकडो विद्यार्थ्यांची आणि पालकांची मोठी सोय होणार आहे. सध्या या शाळेतील विद्यार्थांना आणि पालकांना येथून दिंडोशी बस स्थानकावर उतरून मग ६४६ बस पकडून शाळेत पुढे जावे लागते हे खूपच त्रासदायक होते.आता या बस सेवेमुळे येथील विद्यार्थी,पालक व हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती आमदार प्रभू यांनी शेवटी दिली.