बेस्टच्या एसी बसची हवा गुल

By admin | Published: December 12, 2015 02:10 AM2015-12-12T02:10:13+5:302015-12-12T02:10:13+5:30

मुंबईकरांना गारेगार प्रवास देण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडून एसी बस आणण्यात आल्या. मात्र या बस आता डोकेदुखी ठरत असून ताफ्यातील ६0 टक्के एसी बस बंद आणि ८९ टक्के प्रवाशांची घट झाल्याची धक्कादायक माहिती

Best air bus bus | बेस्टच्या एसी बसची हवा गुल

बेस्टच्या एसी बसची हवा गुल

Next

मुंबई : मुंबईकरांना गारेगार प्रवास देण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडून एसी बस आणण्यात आल्या. मात्र या बस आता डोकेदुखी ठरत असून ताफ्यातील ६0 टक्के एसी बस बंद आणि ८९ टक्के प्रवाशांची घट झाल्याची धक्कादायक माहिती बेस्ट समितीच्या बैठकीतून समोर आली आहे. त्यामुळे बेस्टने मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या या एसी सेवेची हवाच गुल झाली आहे.
अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करतानाच गारेगार अनुभव प्रवाशांना द्यावा या उद्देशाने बेस्ट प्रशासनाने जास्तीत जास्त एसी बस चालविण्याचा निर्णय घेतला. एसी बस चालविल्याने चार चाकी वाहनाने प्रवास करणारा मुंबईकरही याकडे आकर्षित होईल आणि त्यामुळे रस्त्यांवरील वाहनांची संख्यादेखील कमी होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली. त्यानुसार २००७ साली बेस्टकडून एसी बस खरेदी करून त्या प्रवाशांच्या सेवेत आणण्यास सुरुवात केली. मात्र रस्त्यात मध्येच बंद पडणाऱ्या बस, कमी वेग, पावसाळ्यात बसमध्ये होणारी गर्दी अशा अनेक कारणांनी एसी बस सेवेला अक्षरश: पछाडले आणि प्रवाशांनी एसी बस सेवेकडे पाठ फिरविण्यास सुरुवात केली. बेस्टच्या सुरुवातीच्या २८४ एसी बसपैकी फक्त १0९ बसच धावत असल्याचे शुक्रवारी बेस्ट समितीच्या बैठकीत समोर आले.
या बसची संख्या वाढताच सुरुवातीच्या काळात मुंबई व उपनगरात वर्षाला ७६ हजार प्रवासी प्रवास करत होते. मात्र आता प्रवाशांची संख्या आठ हजारांवर आली आहे. ही घट तब्बल ८९ टक्के आहे. याबाबत समितीच्या बैठकीत काँग्रेस सदस्य रवी राजा यांनी एसी बस सेवा बंद करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बस बेस्टने आणाव्यात आणि त्यासाठी महापालिकेची मदत घ्यावी, अशी मागणी केली तर मनसेचे केदार होंबाळकर यांनी मुंबईसारख्या शहरात ही सेवा का चालत नाही, असा सवाल केला.
बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी एसी बससेवा बंद करण्यापूर्वी प्रवाशांना अन्य पर्यायी सेवा उपलब्ध करणे गरजेचे आहे. जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही. यासाठी विविध पर्याय शोधण्यात येत असल्याचे सांगितले.
बेस्टच्या ताफ्यातील एसी बसची संख्या
वर्ष बस
२००७-०८ २८४
२०११-१२ २४०
२०१५ (सप्टेंबर)१३१
२०१५ (डिसेंबरपर्यंत)१०९

Web Title: Best air bus bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.