सर्वसामान्य प्रवाशी, महिलांसाठी ' बेस्ट' ॲप....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 09:23 PM2021-10-08T21:23:39+5:302021-10-08T21:23:45+5:30

बेस्टच्या डिजीटायलायझेशनवर आगामी आर्थिक वर्षात भर देण्यात येणार आहे. यात प्रवासासाठी स्मार्ट कार्ड, डेबिट क्रेडीट कार्डबरोबरच ऑनलाईन तिकीट पैसे भरण्याची सोयही उपलब्ध करण्यात येणार आहे.

Best app for women and passenger in mumbai by traveling bus transport | सर्वसामान्य प्रवाशी, महिलांसाठी ' बेस्ट' ॲप....

सर्वसामान्य प्रवाशी, महिलांसाठी ' बेस्ट' ॲप....

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - बेस्ट उपक्रमाचा सन २०२२- २३ चा अर्थसंकल्प तुटीचा असला तरी मुंबईकरांचा प्रवास सुकर करण्यासाठी अनेक प्रयोग सुरू आहेत. यामध्ये प्रवासाचे नियोजन करता यावे, यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात येणार आहे. तसेच महिलांसाठी विशेष बससेवा व इलेक्ट्रिक बसगाड्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

बेस्टच्या डिजीटायलायझेशनवर आगामी आर्थिक वर्षात भर देण्यात येणार आहे. यात प्रवासासाठी स्मार्ट कार्ड, डेबिट क्रेडीट कार्डबरोबरच ऑनलाईन तिकीट पैसे भरण्याची सोयही उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून बेस्ट बसची सद्यस्थिती प्रवाशांना समजणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करण्यास मदत होणार आहे.

बेस्ट बसगाड्यांचा कारभार पेपरलेस करण्यासाठी विविध योजना आणण्यात येत आहे. त्याचबरोबर वीज विभागाचा कारभारही पेपरलेस करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. सध्या ६५ टक्के ग्राहक ऑनलाईन वीज बिल भरत असून आगामी वर्षात हे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे बेस्ट प्रशासनाचे लक्ष्य आहे. 

महिलांसाठी विशेष ॲप्लिकेशन...

महिलांसाठी आपत्कालिन परिस्थितीत मदतीसाठी मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे. या ॲप्लिकेशनच्या मदतीने तत्काळ महिलांना मदत पोहचविणे शक्य होणार आहे.

‘ईलेक्ट्रीक बसगाड्यांची संख्या वाढविण्याबरोबरच पेपरलेस कामकाजाकडे वाटचाल करण्यात येत आहे. तसेच बस प्रवाशी आणि वीज ग्राहकांना अधिक सुविधा पुरविण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.

-लोकेश चंद्र (महाव्यवस्थापक, बेस्ट)

बेस्ट उपक्रम अधिकाधिक स्मार्ट करण्यावर भर दिला जात आहे. प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी बसगाड्यांचा ताफा वाढविण्यात येत आहे. तसेच, वीज ग्राहकांसाठी विविध योजना आणल्या जात आहेत. आर्थिक चणचणीची झळ बेस्ट प्रवासी आणि वीज ग्राहकांना पोहचू न देण्यासाठी भाडेवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.

- आशिष चेंबूरकर (बेस्ट समिती अध्यक्ष)

 

विरोधकांमध्ये नाराजीचा सूर....

बेस्टची अर्थसंकल्पीय बैठक शुक्रवारी ऑनलाईन झाली. बैठकीत महाव्यवस्थापकांनी अध्यक्षांना अर्थसंकल्पाची प्रत सादर केली. मात्र, सदस्यांना संध्याकाळपर्यंत ही प्रत मिळाली नव्हती. याबाबत विरोधी पक्षनेते रवी राजा आणि भाजपचे बेस्ट सदस्य सुनिल गणाचार्य यांनी नाराजी व्यक्त केली. 

Web Title: Best app for women and passenger in mumbai by traveling bus transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट