Join us

बेस्टची स्वयंचलित डिझेल भरणाप्रणाली कार्यान्वित

By admin | Published: April 18, 2016 1:00 AM

बेस्ट प्रशासनाकडून शिवाजी नगर आगारात स्वयंचलित डिझेल भरणाप्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ही प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर विनामूल्य राबवण्यात येत असून, अशाप्रकराची

मुंबई : बेस्ट प्रशासनाकडून शिवाजी नगर आगारात स्वयंचलित डिझेल भरणाप्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ही प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर विनामूल्य राबवण्यात येत असून, अशाप्रकराची कार्यप्रणाली देशातील सर्व राज्य परिवहन उपक्रमांमधून बेस्ट उपक्रमामध्ये प्रथम लागू करण्यात आली आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे.बेस्ट उपक्रमामध्ये डिझेल इंधनावर चालणाऱ्या एकूण १ हजार १४५ बसगाड्या कार्यरत आहेत. त्या वेगवेगळ्या १४ बस आगारांमध्ये समाविष्ठ करण्यात आल्या आहेत. शिवाजी नगर आगारातील एकूण बसगाड्यांचा ताफा १४७ आहे. येथे नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या प्रणालीमुळे प्रत्येक बसमध्ये इंधन भरल्याची नोंद आॅटोमेटीक मिळणार आहे. शिवाय प्रत्येक बसने कापलेल्या अंतराची अचूक नोंद मिळणार आहे. ही प्रणाली बिनतारी संदेशवहनामार्फत कार्यरत असून, ती मानवी हस्तक्षेपापासून संरक्षित आहे. प्रणालीमुळे इंधन टाकीमध्ये अतिरिक्त इंधन गेल्यास धोक्याचा इशारा मिळणार असून, त्यामुळे पंप तातडीने बंद होण्याची सुविधाही आहे. बसचालकाची चूक आढळल्यास त्याला योग्य मार्गदर्शन करणेही सुलभ होणार आहे. (प्रतिनिधी)